जाहिरात

Pune News: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाजवळ मोठा अनर्थ टळला, भीतीपोटी परिसरातील नागरिक घराबाहेर पळाले

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाजवळील एका इमारतीबाहेर शनिवारी सायंकाळी 7.30 वाजताच्या ट्रान्सफॉर्मरचा भीषण स्फोट झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.

Pune News: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाजवळ मोठा अनर्थ टळला, भीतीपोटी परिसरातील नागरिक घराबाहेर पळाले
Pune Transformer Blast News Today
पुणे:

सूरज कसबे, प्रतिनिधी

Pune News Today :  पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाजवळील एका इमारतीबाहेर शनिवारी सायंकाळी 7.30 वाजताच्या ट्रान्सफॉर्मरचा भीषण स्फोट झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र,अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं आणि मोठी जीवितहानी टळली.मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तालय परिसरातील एका इमारतीबाहेरील ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक मोठा तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे भीषण स्फोट होऊन ट्रान्सफॉर्मरने पेट घेतला. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, परिसरातील नागरिक भीतीने घराबाहेर पडले. आगीचे लोळ शेजारील इमारतीच्या पार्किंगपर्यंत पोहोचल्याने वाहनांनाही धोका निर्माण झाला होता.

अग्निशामक दलाच्या तीन गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाच्या तीन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत पाण्याचा मारा करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले.अग्निशमन दलाच्या या तत्परतेमुळे आग इमारतीच्या वरच्या मजल्यांपर्यंत पसरली नाही,ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

नक्की वाचा >> Pune News : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार? 'त्या' एका बॅनरमुळे राजकीय उलथापालथ होणार

परिसरातील वीजपुरवठा काही काळ झाला खंडित

वीजपुरवठा खंडित खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित करण्यात आला होता.या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसली तरी,ट्रान्सफॉर्मरचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू असणार आहे.

नक्की वाचा >> Mumbai News : भाजपने मुरूगन सेल्वन यांना दिली मोठी जबाबदारी, मुंबईच्या 'या' विभागासाठी अध्यक्षपदावर नियुक्ती

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com