रेवती हिंगवे, पुणे
Pune News : पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत ६ जुलैच्या दरम्यान एक चोरीची घटना घडली होती. आर जे ज्वेलर्स नावाच्या बुधवार पेठेत असलेल्या या सराफाच्या दुकानामध्ये एका अज्ञात इसमाने १ ग्राम सोन्याचे दागिने चोरले. एकूण ४ लाख ७४ हजार रुपयांचे सोन्यांचे दागिने त्याने चोरले. विशेष म्हणजे त्याने चोरण्यासाठी या दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या वॉशरूममधून आत आला.
या सगळ्या घटनेची दाखल पुणे पोलिसांनी घेतली आणि अज्ञात इसमविरोधात पुण्यातील फरसखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपीला पकडण्याच्या हेतूने, पुणे पोलिसांनी तब्बल २५० ते ३०० CCTV कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्यानंतर असे निष्पन्न झाले की आरोपी हा मूळचा जरगमार्जूनहल्ली कर्नाटकचा आहे. त्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी तपास चालू केला आणि काही पथक रवाना करण्यात आली.
(नक्की वाचा- Beed News : एक छोटी चूक अन् दोन दिवस डांबून ठेवत अमानूष मारहाण; तरुणाचा मृत्यू)
जेव्हा पुणे पोलीस त्याचा राहत्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना तो तिथे सापडला नाही. परंतु त्याचे कहाडपत्रे, कॉलेजचे ID कार्ड आणि इतर वस्तू आढळून आले. त्यातून असा निष्पन्न झाल की आरोपी हा १९ वर्षीय इंजिनियरिंगचा विद्यार्थी आहे आणि त्याची ओळख लिखित जी अशी पटलेली आहे.
(नक्की वाचा- Exclusive : अख्खं गाव रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णालयात, छत्रपती संभाजीनगरच्या फारोळा गावात काय घडलं?)
आरोपी तब्बल ४ दिवस फरार होता आणि राहत्या घरी देखील तो आला नव्हता. त्यानुसार पुणे पोलिसांनी सापळा रचत त्याला ४ दिवसांनी कर्नाटकमधील गांधीनगर येथून ताब्यात घेतले आणि पुणे न्यायालयासमोर १६ जुलै ला हजर केले. १९ जुलैपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पुणे पोलीस हे करत आहेत.