जाहिरात

Mumbai News : मंत्री गिरीश महाजनांना वाहतूक कोंडीवरुन भिडणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल? काय आहे सत्य?

मुंबई पोलिसांनी ट्वीट करीत याबाबत माहिती दिली आहे.

Mumbai News : मंत्री गिरीश महाजनांना वाहतूक कोंडीवरुन भिडणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल? काय आहे सत्य?

Mumbai News : मुंबईतील भाजपच्या नारी शक्ती रॅली एका महिलेमुळे चर्चेत राहिली. भाजपच्या रॅलीमुळे मुंबईतील रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे संतापलेल्या महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांना धारेवर धरलं. या महिलेवर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्याचं वृत्त काही माध्यमांवर प्रसिद्ध झालं होतं. यावरुन अनेकांना संताप व्यक्त केला होता. दरम्यान आता मुंबई पोलिसांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली.

मंत्र्यांशी भिडणाऱ्या महिलेविरोधात पोलिसात तक्रार?

मुंबई पोलिसांनी ट्वीट करीत याबाबत माहिती दिली आहे. कथित महिलेविरोधात कोणतीही केस दाखल करण्यात आलेली नाही. मी तुम्हाला आणि सर्वांना आवाहन करतो की, केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा.

सुरुवातीला आलेल्या काही वृत्तांमध्ये दावा करण्यात आला होता की, वकील गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी जेन सतावर्ते ही कथित महिलेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती. मात्र पोलिसांनी याबाबत कोणतीही तक्रार किंवा गुन्हा नोंदविलेला नाही. पोलिसांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबईत २१ एप्रिल रोजी काय घडलं?

२१ एप्रिल रोजी भाजपने एक मोठी रॅली काढली होती. यामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे एका महिलेने पोलीस आणि तेथे उपस्थित भाजप आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर संताप व्यक्त केला. मंत्री गिरीश महाजन यांनी वाहतूक कोंडीबाबत दिलगिरी व्यक्त केली, मात्र महिलेने ज्या पद्धतीची भाषा वापरतील ते योग्य नसल्याचंही म्हटलं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com