जाहिरात

AI मुळे सरकारचे 1045 कोटी वाचले; करदात्यांकडून रिटर्नचा झोल असा झाला उघड

गोंदिया जिल्ह्यातून सर्वाधिक बनावट रिटर्न्स आढळले असून, विशेष म्हणजे हे सर्व रिटर्न्स एकाच ई-मेल आयडीवरून भरले गेले होते.  यामुळे सीए आणि गुंतवणूक सल्लागार यांचा संगनमताचा संशय व्यक्त केला जात आहे.

AI मुळे सरकारचे 1045 कोटी वाचले; करदात्यांकडून रिटर्नचा झोल असा झाला उघड

Income Tax Return: कॅन्सर आणि किडनी फेल्युअर यांसारख्या गंभीर आजारांचा खोटा दावा करून इन्कम टॅक्स विभागाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. देशभरात तब्बल 4 हजार टॅक्सपेयर्सनी रिटर्नमध्ये खोटा मेडिकल बनाव करून टॅक्स सवलत मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

इन्कम टॅक्स विभागाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने रिटर्न्सची सखोल छाननी केली असता हा प्रकार उघडकीस आला. कलम 80DDB नुसार 'टर्मिनल इलनेस' म्हणजे बरे न होणारे गंभीर आजार झाल्यास कर सवलत दिली जाते. ही सवलत रुग्णाच्या कुटुंबीयांनाही लागू होते, आणि त्याचाच गैरफायदा घेत खोटे दावे करण्यात आले.

(नक्की वाचा-  Ola Uber Strike: संपाने बळी घेतला, आर्थिक गणित कोलमडल्याने उबरचालकाने उचलले टोकाचे पाऊल)

गोंदिया जिल्ह्यातून सर्वाधिक बनावट रिटर्न्स आढळले असून, विशेष म्हणजे हे सर्व रिटर्न्स एकाच ई-मेल आयडीवरून भरले गेले होते.  यामुळे सीए आणि गुंतवणूक सल्लागार यांचा संगनमताचा संशय व्यक्त केला जात आहे. आयकर विभागाने AI च्या साहाय्याने खातेदारांच्या डिजिटल हालचाली, IP अॅड्रेस, लॉगिन डिव्हाइस यांचा मागोवा घेतला गेला. ज्या संगणकावरून मोठ्या प्रमाणात हे रिटर्न्स भरले गेले, त्याची सखोल चौकशी लवकरच होणार आहे.

(नक्की वाचा-  मुंबईत इमर्जन्सी लँडिंगदरम्यान पायलटने PAN.. PAN.. PAN का म्हटलं? काय आहे त्याचा अर्थ?)

फक्त नागपूर झोनमध्येच 9 हजारांहून अधिक संशयित रिटर्न्स असल्याचं आयकर विभागाच्या चौकशीत समोर आलं आहे. गेल्या 4 महिन्यांत देशभरातील 40 हजार टॅक्सपेयर्सना SMS आणि ईमेल पाठवून चुकीची माहिती दिल्याची कल्पना देण्यात आली. यापैकी अनेकांनी आपले दावे तात्काळ मागे घेतले.

या मोहिमेमुळे सरकारचे 1 हजार 45 कोटी रुपयांचे रिटर्न रोखण्यात यश आलं आहे, अशी माहिती इन्कम टॅक्स विभागाने दिली आहे. आगामी काळात फसवणूक करणाऱ्यांविरोधात कारवाई अधिक तीव्र होणार, अशी माहिती आयकर आयुक्त व्ही. रजिता यांनी दिली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com