जाहिरात

Pune News : बन-मस्कासाठी राडा; नगरसेविकेच्या पुत्राचा महापालिकेतच हायव्होल्टेज ड्रामा, थेट शिपायाला धमकावलं!

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतून एक धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार समोर आला आहे.

Pune News : बन-मस्कासाठी राडा; नगरसेविकेच्या पुत्राचा महापालिकेतच हायव्होल्टेज ड्रामा, थेट शिपायाला धमकावलं!
AI Image

सुरज कसबे, प्रतिनिधी

Pune News : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतून एक धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका महिला नगरसेविकेच्या मुलाने केवळ बन-मस्का मिळाला नाही या कारणावरून महापालिका भवनात जोरदार धिंगाणा घातला. या प्रकारामुळे महापालिका वर्तुळात लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांच्या वाढत्या हस्तक्षेपावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नेमकी घटना काय ?

महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर एका महत्त्वाच्या समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला समितीचे अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते. बैठक पार पडल्यानंतर एका महिला नगरसेविकेचा मुलगा तिथे पोहोचला आणि त्याने समिती कार्यालयातील शिपायावर हुकूमशाही गाजवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याने शिपायाला चहा आणण्यास सांगितले. क्षणभरानंतर विचार बदलून त्याने कॉफीची मागणी केली. पुन्हा विचार फिरला आणि त्याने चहा सोबत बनमस्का आणण्याचा आदेश दिला. मात्र, कॅन्टीनमध्ये बनमस्का उपलब्ध नसल्याचे शिपायाने नम्रपणे सांगितले. हे ऐकताच या नगरसेविका पुत्राचा पारा चढला. (Pimpri-Chinchwad Municipal Corporation)

नक्की वाचा - Pune News : पुण्यात पुन्हा भयंकर घडलं; मुठा नदीपात्रातील अंधाराचा घेतला फायदा, 'त्या' भीषण दृश्याने खळबळ

मी सांगतोय तर तुला कळत नाही का? अशा भाषेत त्याने शिपायाला सर्वांसमोर दम भरला. एवढ्यावरच न थांबता त्याने थेट कॅन्टीन चालकाला फोन लावून माझ्यासाठी बनमस्का का तयार नाही ? अशी विचारणा करत गोंधळ घातला. अखेर घाबरलेल्या शिपायाने कुठूनतरी चहा आणि बनमस्काची व्यवस्था केल्यानंतरच या महाशयांचा राग शांत झाला.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com