जाहिरात

Pune News : पुण्यात पुन्हा भयंकर घडलं; मुठा नदीपात्रातील अंधाराचा घेतला फायदा, 'त्या' भीषण दृश्याने खळबळ

पुण्यातील भिडे पुलाजवळील नदीपात्रात पुन्हा एकदा भयाण घटना उघड झाली आहे.

Pune News : पुण्यात पुन्हा भयंकर घडलं; मुठा नदीपात्रातील अंधाराचा घेतला फायदा, 'त्या' भीषण दृश्याने खळबळ

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune News : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील भिडे पुलाजवळील नदीपात्रात पुन्हा एकदा भयाण घटना उघड झाली आहे. गेल्या काही दिवसातील ही दुसरी घटना आहे. भिडे पुलाजवळील नदीपात्र परिसरात एका अज्ञात व्यक्तीची निघृणपणे हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

पुण्याची जीवनवाहिनी असलेल्या मुठा नदीच्या पात्रात भिडे पुलाजवळ एका भीषण दृश्याने खळबळ उडाली. आज १९ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास काही नागरिक या परिसरात जात असताना त्यांना एक व्यक्ती रक्ताच्या थोराळ्यात पडलेली दिसली. हल्लेखोरांनी या व्यक्तीला धारदार शस्त्राने मारल्याचं दिसून येत आहे. इतकच नाही तर त्याला दगडाने ठेचून हत्याचा केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

नक्की वाचा - Pune News : पुण्यातील झेड ब्रिजवर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यासोबत भयंकर घडलं; तरुण-तरुणीला रस्त्यातच...


नदीपात्रातील अंधाराचा फायदा घेत हत्या...

पुण्यातील मध्यवस्तीत असलेल्या भिडे पुलाजवळ आज पहाटेच्या सुमारास एका थरारक घटनेने शहर हादरून गेलं आहे. मुठा नदीपात्राच्या परिसरात एका अज्ञात व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याचे उघडकीस आले असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आलं आहे. फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळावरील रक्ताचे नमुने, ठसे आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, बेपत्ता व्यक्तींच्या नोंदीही तपासल्या जात आहेत. ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली? जुने वैमनस्य, पैशांचा वाद की अन्य काही कारण? याचा शोध आता पुणे पोलीस घेत आहेत. पहाटेच्या अंधाराचा फायदा घेऊन आरोपींनी हे कृत्य केल्याचे दिसत असून, पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com