जाहिरात

Shocking News: पुढच्या महिन्यात लग्न होणार होतं, महिला न्यूज अँकरने चॅनेलच्या स्टुडिओत घेतला गळफास, कारण..

गुवाहाटीहून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका स्थानिक न्यूज पोर्टलच्या महिला अँकरने ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

Shocking News: पुढच्या महिन्यात लग्न होणार होतं, महिला न्यूज अँकरने चॅनेलच्या स्टुडिओत घेतला गळफास, कारण..
Female Anchor Suicide Case
मुंबई:

Female Anchor Suicide Case:  गुवाहाटीहून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका स्थानिक न्यूज पोर्टलच्या महिला अँकरने ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. महिला पत्रकार सोमवारी पहाटे डिजिटल न्यूज पोर्टलच्या ऑफिसमध्ये मृत अवस्थेत आढळली. पुढच्या महिन्यातच तिचं लग्न होणार होतं. पण महिलेनं जीवन संपवल्यानं तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.रितूमोनी रॉय असं मृत महिलेचं नाव आहे. न्यूज पोर्टलचं ऑफिस गुवाहाटीच्या एका वस्तीत आहे. याच ऑफिसमध्ये रितुमोनी मृत अवस्थेत आढळली आहे. या घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. महिलेनं आत्महत्या का केली? यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीय. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. 

महिला अँकरने सुसाइड नोटमध्ये काय लिहिलं?

गुवाहाटी पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाइड नोटमध्ये लिहिलंय की, “हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे,मला माफ करा.”.प्राथमिक रिपोर्टनुसार,रितुमोनी 23 नोव्हेंबरला ऑफिसला गेली होती. पण शिफ्ट संपल्यानंतर रात्री घरी परतलीचनाही. सोमवारी सकाळी तिचे सहकारी ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा रितुमोनीचा मृतदेह पाहून ते थक्क झाले.पारिवारिक सूत्रों ने संकेत दिया है कि रितुमोनी के कथित आत्महत्या के पीछे की वजह फाइनेंशियल हो सकती है. हालांकि पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है. पुलिस इस कथित आत्महत्या के सभी पहलुओं की बारीकी से जांच कर रही है.

नक्की वाचा >> Viral Video: प्रसुती महिलेला रस्त्यातच सोडून चालक पळाला,तान्ह्या बाळासाठी आईनं केलं..डोळेच पाणावतील!

लग्नाच्या 12 दिवस आधी आत्महत्या का केली?

रितुमोनीने याआधी अनेक डिजिटल मीडिया संस्थांमध्ये काम केलं आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, महिला अँकरचं लग्न पुढच्या महिन्यात 5 डिसेंबरला होणार होतं. लग्नाचे कार्डही वाटले गेले होते. घटनेच्या पहिल्या रात्री ती एका मित्राच्या घरी प्री-वेडिंग समारंभात सहभागी झाली होती, त्यानंतर ती ऑफिसला आली आणि नंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्थिक विवंचनेतून रितूमोनीने आत्महत्या केली असावी,असं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. दरम्यान, पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरु आहे.

नक्की वाचा >> Dharmendra Death : सर्वांना खळखळून हसवतो!आज मात्र पुरता तुटला..कपिल शर्मासाठी धर्मेंद्र कोण होते? 2 शब्दातच..

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com