जाहिरात

Viral Video: प्रसुती महिलेला रस्त्यातच सोडून चालक पळाला,तान्ह्या बाळासाठी आईनं केलं..डोळेच पाणावतील!

पालघरच्या मोखाडा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

Viral Video: प्रसुती महिलेला रस्त्यातच सोडून चालक पळाला,तान्ह्या बाळासाठी आईनं केलं..डोळेच पाणावतील!
Palghar Woman Video
मुंबई:

मनोज सातवी, प्रतिनिधी

Palghar Delivery Woman Shocking Video: पालघरच्या मोखाडा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आमला गावातील एक महिलेची प्रसुती झाल्यानंतर रुग्णावाहिकेचा चालक तिला रस्त्यातच सोडून पळून गेला. गावात पोहोचायला 2 किलोमीटरचे अंतर बाकी होते, तरीही चालकाने प्रसुती महिलेसह तिच्या बाळाला रस्त्यातच सोडले. त्यानंतर या महिलेनं बाळाला सोबत घेऊन चक्क 2 किमीची पायपीट केली. महिलेचा आणि बाळाचा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

त्या ठिकाणी नेमकं काय घडलं? 

सविता नावाच्या महिलेला प्रसुतीसाठी 19 नोव्हेंबरला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.परंतु, या महिलेला पुढील उपचारांसाठी जव्हार कुटीर रुग्णालयात हलवण्यात आलं. या रुग्णालयात महिलेची प्रसुती सुखरूपरित्या झाली.त्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलं. तिला रुग्णवाहिकेमार्फत घरी सोडण्यासाठी पाठवण्यात आले होते.मात्र रुग्णवाहिका गावात न जाता दोन किमी आधीच थांबवण्यात आली आणि चालकाने रस्त्यातूनच पळ काढला. 

नक्की वाचा >>  Dharmendra Death : सर्वांना खळखळून हसवतो!आज मात्र पुरता तुटला..कपिल शर्मासाठी धर्मेंद्र कोण होते? 2 शब्दातच..

इथे पाहा काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ

कुटुंबीयांनी आरोग्य यंत्रणेवर व्यक्त केला संताप

त्यावेळी प्रसुती झालेल्या महिलेसोबत तिची आई आणि सासूबाई होती. त्यानंतर सविताने नवजात बाळाला हातात घेऊन दोन किमीची पायपीट केली.या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. प्रसुती झालेल्या महिलेला आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता,तर याला जबाबदार कोण?असा थेट सवाल उपस्थित केला जता आहे. या घटनेमुळं मोखाडा आरोग्य यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. 

नक्की वाचा >> मुस्लीम अभिनेत्याशी लफडं अन् ब्रेकअप..आता करतेय उद्योगपतीशी लग्न, 39 वर्षांची हिरोईन आहे तरी कोण?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com