जाहिरात

Nandurbar News: नंदूरबारमध्ये खळबळ! 'या' शासकीय वसतिगृहात 50 विद्यार्थ्यांना विषबाधा, तिघांची प्रकृती चिंताजनक

शहादा शहरातील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना दिलेल्या जेवणानंतर अन्नातून विषबाधेची घटना घडली.

Nandurbar News: नंदूरबारमध्ये खळबळ! 'या' शासकीय वसतिगृहात 50 विद्यार्थ्यांना विषबाधा, तिघांची प्रकृती चिंताजनक
Nandurbar Food Poisoning Case

प्रशांत जव्हेरी, प्रतिनिधी

Nandurbar Food Poisoning News :  शहादा शहरातील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना दिलेल्या जेवणानंतर अन्नातून विषबाधेची घटना घडली. या घटनेत जवळपास 40 ते 50 विद्यार्थ्यांना उलट्या,मळमळ आणि अस्वस्थतेचा त्रास झाल्याची प्राथमिक माहिती आहे.तीन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शहादा शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी रात्रीच्या जेवणात डाळ-भात,शेवग्याची भाजी आणि चपातीचे सेवन केले. नंतर अवघ्या 15 मिनिटांत अनेक विद्यार्थ्यांना उलट्या,मळमळ आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाला.परिस्थिती गंभीर होताच प्रशासनाने तातडीने विद्यार्थ्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या सर्व बाधित विद्यार्थ्यांवर शहादा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नक्की वाचा >> Gold-Silver Price : सोन्या-चांदीचं मार्केट डाऊन! 'इतक्या' रुपयांनी झाली मोठी घसरण, पुढील 3 महिन्यात..

यापूर्वी विद्यार्थ्यांना दिले निकृष्ठ दर्जाचं अन्न

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार संभाजी पाटील,प्रांताधिकारी दीपक गिरासे तसेच पोलिस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले.त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून घटनेची माहिती घेतली.दरम्यान, वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी यापूर्वीही निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याबाबत अनेकदा तक्रारी केल्याचा दावा केला आहे.मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

नक्की वाचा >>  Shirdi News: "आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर", शिर्डीत नितेश राणे भडकले, म्हणाले, "हिंदू तरुणांनी.."

तसेच घटना घडल्यानंतरही वसतिगृहाचे वॉर्डन आणि संबंधित शिक्षक रुग्णालयात न आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत तीव्र नाराजी व्यक्त केली.या घटनेमुळे समाजकल्याण विभागाच्या वस्तीगृहातील अन्नाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अन्न विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com