शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळेंविरोधात घातपात? गीता खरेंसह पाच जणांवर गुन्हा दाखल

शिवाजीराव जोंधळे यांची दुसरी पत्नी गीता खरे आणि त्यांच्या नातेवाईकांनी हत्या केल्याचा आरोप केला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

ठाण्याचे शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळेंच्या मृत्यूप्रकरणात (Shivajirao Jondhale) FIR दाखल करण्यात आला आहे. शिवाजीराव जोंधळेंच्या मुलाच्या तक्रारीनंतर जोंधळेंच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात पार्टनर गीता खरेंसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गीता खरे यांच्याविरोधात शैक्षणिक संस्था हडपण्यासाठी उपचारात हयगय केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. शिवाजीराव जोंधळे यांचं एप्रिलमध्ये कर्करोगाने निधन झालं होतं. दोन वर्षांपूर्वी त्यांना यकृताच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. शिवाजीराव जोंधळे यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे. या प्रकरणात विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

शिवाजीराव जोंधळे हे ठाण्यातले शिक्षणसम्राट मानले जातात. शिवाजी जोंधळेंच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत. शिवाजीरावांचं एप्रिलमध्ये लिव्हरच्या कॅन्सरने मृत्यू झाला. शिवाजीरावांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी मुलगा सागरने तक्रार दाखल केली आहे. कोर्टाने पोलिसांना गुन्हा दाखल करायला सांगून चौकशीचे आदेश दिले आहेत. गीता खरे यांच्यासह त्यांचा मुलगा हर्षकुमार, मुलगी स्नेहा खरे, वर्षा देशमुख, जावई प्रीतम देशमुखविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नक्की वाचा - लाडकी बहीण योजनेसाठी निवडणूक लांबणीवर? विधानसभा निवडणुका कधी होणार?

गीता खरे या जोंधळेंच्या शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी आहेत. गीता खरे या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या नंतर त्या शिवाजीरावांच्या पार्टनर झाल्या. शिवाजीरावांच्या उपचारात हयगय केल्याचा पार्टनर गीता खरेंवर आरोप जोंधळेंचा मुलगा सागर यकृत डोनेट करायला तयार असतानाही गीता खरेंनी ते होऊ न दिल्याचा आरोप केला आहे. शिवाजीराव जोंधळे नियंत्रक असलेल्या विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव गीता खरे (शिवाजीराव यांची दुसरी पत्नी) आणि त्यांचा खरे कुटुंबातील मुलगा, मुलगी, सून, जावई यांनी शिवाजीराव यांची मालमत्ता हडप करण्यासाठी शिवाजीराव जोंधळे यांन त्रास दिल्याचा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे. 

शिवाजीराव जोंधळे यांची दुसरी पत्नी गीता खरे आणि त्यांच्या नातेवाईकांनी हत्या केल्याचा आरोप केला आहे. शिवाजी राव यांच्यावर कॅन्सरचे निदान झाल्यानंतर गीता खरे यांनी उपचार होऊ दिले नाहीत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी प्रमोद हिंदुराव यांनी पोलिसांवर दबाव आणून ही घटना लपविण्याचा प्रयत्न केल्याचा जोंधळे यांच्या मुलांनी केला आरोप केला आहे. कल्याणमधील काही गुंडांना हाताशी घेण्यात आले होते. शेवटच्या दहा दिवसात वडिलांना कोणाला भेटून देखील दिले नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. 

Advertisement