जाहिरात

Flight Luggage Rule : फ्लाइटमधील लगेज नियमांमध्ये बदल, किती किलोची बॅग घेऊन जाऊ शकाल?

2025 वर्षात हवाई प्रवासातील काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

Flight Luggage Rule : फ्लाइटमधील लगेज नियमांमध्ये बदल, किती किलोची बॅग घेऊन जाऊ शकाल?
मुंबई:

2025 वर्षात हवाई प्रवास करताना नागरिकांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. विमान प्रवाशाच्या काही नियमात बदल करण्यात येणार आहेत.  प्रवासी विमानात घेऊन जाणाऱ्या सामानांच्या नियमांमध्ये (Flight Luggage Rule) मोठे बदल करण्यात आले आहेत. BCAS च्या (Bureau of Civil Aviation Security) नव्या नियमांतर्गत आता प्रवाशांना फ्लाइटमध्ये केवळ एकाच हँडबॅग किंवा केबिन बॅग घेऊन जाण्याची परवानगी असेल. हा नियम देशांतर्गत आणि परदेशातील विमानांसाठी लागू असेल. प्रवाशांची वाढती संख्या पाहता नियमांमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती आहे. 

Air India Flight : प्रवासी विमानातचं 'झिंगाट'; 4 तासांच्या प्रवासात अख्खी दारु रिचवली, स्टॉकच संपला

नक्की वाचा -  Air India Flight : प्रवासी विमानातचं 'झिंगाट'; 4 तासांच्या प्रवासात अख्खी दारु रिचवली, स्टॉकच संपला

BCAS आणि एअरपोर्टच्या सुरक्षेसाठी तैनात CISF यांनी नियम अधिक कडक केले आहेत. एअर इंडियानुसार, प्रीमियम इकोनॉमी आणि इकोनॉमी क्लासच्या सर्व प्रवाशांना अधिकांश 7 किलोपर्यंत हँड बॅग घेऊन जाण्याची परवानगी आहे. तर बिझनेस किंवा प्रथम वर्गाच्या प्रवाशांसाठी दहा किलोपर्यंत मर्यादा आहे. बॅगेचा आकार 40 सेंमी, 20 सेमी आणि 55 सेमीहून जास्त असू नये.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एक हँड बॅकेव्यतिरिक्त ज्या बँगा असतील त्या चेक इन कराव्या लागतील. इंडिगो एअरलाइन्सनेही आपल्या हँड बॅगेच्या नियमात बदल केले आहेत. इंडिगोच्या प्रवाशांना एक केबिन बॅग घेऊन जाता येईल. इंडिगोमध्ये प्रवाशांना दोन बॅग घेऊन जाण्याची परवानगी असेल. बॅगेचा आकार 115 सेमीहून अधिक असू नये आणि वजन सात किलोपर्यंत असावा. 

एक पर्सनल बॅग, म्हणजे महिलांची पर्स किंवा छोटी लॅपटॉप बॅग घेऊन जाता येऊ शकते. ज्याचं वजन तीन किलोहून जास्त असू नये. इंडिगोमध्ये दोन बॅगा घेऊन जाण्याची सुविधा मिळते. एक केबिन बॅग आणि एक पर्सनल बॅग. नियमांची पूर्तता केली नाही तर अधिक रक्कम आकारण्यात येईल किंवा दंडही ठोठवावा लागेल. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: