जाहिरात

Flood relief: पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा, परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय

मंत्रालयात राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली.

Flood relief: पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा, परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय
मुंबई:

राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पुरामुळे कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. शिवाय या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सोबतच शैक्षणिक संस्थांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

नक्की वाचा - OBC students: ओबीसी विद्यार्थ्यांची मोठी चिंता मिटली, आता प्रत्येक जिल्ह्यात मिळणार...

मंत्रालयात राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींचा आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक घेण्यात आली. या बैठकीला उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव प्रताप लुबाळ, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अजय भामरे, तसेच राज्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नक्की वाचा - Ladki Bahin Yojana: E- KYC, OTP ची चिंता मिटणार, पण 'या' लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, अनेक विद्यार्थ्यांचे साहित्य आणि शैक्षणिक साधने पुरामुळे नष्ट झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालये, विद्यापीठे आणि खासगी शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, गणवेश अशा स्वरूपात सामाजिक कर्तव्य म्हणून मदत करावी. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांचे शिक्षण अखंडितपणे सुरू राहील. विद्यार्थ्यांना मदत करण्याची सरकारची भूमीका सरकारची असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com