जाहिरात

Maharashtra Flood Relief : अतिवृष्टीग्रस्तांसाठी 31,628 कोटींच्या पॅकेजची घोषणा, वाचा शेतकऱ्यांना काय मिळणार?

Maharashtra Flood Relief Package: राज्यात यंदा खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने मोठे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे.

Maharashtra Flood Relief : अतिवृष्टीग्रस्तांसाठी 31,628 कोटींच्या पॅकेजची घोषणा, वाचा शेतकऱ्यांना काय मिळणार?
Maharashtra Flood Relief Package: शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी मदत जमा करण्याचा सरकारचा आग्रह असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.
मुंबई:

Maharashtra Flood Relief Package: राज्यात यंदा खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने मोठे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या समवेत आयोजित पत्रकार परिषदेत अतिवृष्टीग्रस्तांसाठी एकूण 31,628 रुपये कोटींचे पॅकेज जाहीर केले. शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी मदत जमा करण्याचा सरकारचा आग्रह असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

या ऐतिहासिक पॅकेजमध्ये पीक नुकसान, जमिनीची धूप, घर आणि जनावरांचे नुकसान, तसेच पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी भरीव मदत समाविष्ट आहे.

प्रमुख मदतीची घोषणा आणि तपशील (Key Package Details)

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील भीषण परिस्थिती, झालेले जीव आणि मालमत्तेचे नुकसान, तसेच शेतकरी आणि शेतीच्या नुकसानीची माहिती दिली. राज्यातील 1 कोटी 43 लाख 52 हजार 141 हेक्टर क्षेत्रावर असलेल्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, यापैकी 29 तालुक्यांमध्ये सर्वाधिक फटका बसला आहे.

( नक्की वाचा : Mumbai Metro 3: मुंबईची Aqua Line पूर्ण क्षमतेने सुरू होणार! पाहा स्टेशन्सचा First Look; वाचा खास वैशिष्ट्ये )
 

पीक आणि जमीन नुकसानीसाठी थेट मदत (Direct Aid for Crop & Land Loss)

मदतीचा प्रकार                                                           प्रति हेक्टरी रक्कम (₹)
खरडून गेलेल्या जमिनीसाठी (रोख)                                       47,000
खरडून गेलेल्या जमिनीसाठी (मनरेगा माध्यमातून)                    3,00,000
एकूण (खरडून गेलेल्या जमिनीसाठी)                                      3,47,000
हंगामी बागायती शेतीसाठी                                                   27,000
बागायती शेतीसाठी                                                                32,500
रब्बी पीक घेता यावे यासाठी (प्रति हेक्टर)                                  10,000
विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना (विमा व्यतिरिक्त)                        17,000
कोरडवाहू शेतीसाठी                                                           35,000
विमा उतरवलेल्या बागायती शेतीला                                     50,000 हून अधिक


शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई म्हणून 65 लाख हेक्टर साठी 10,000 कोटी रुपये आणि इतर बाबींसाठी 27,000 रुपये ते 32,500 रुपयापर्यंतची मदत जाहीर करण्यात आली आहे.

ओला दुष्काळामधील सर्व निकषांवर ही मदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


इतर नुकसानीसाठी भरीव मदत (Other Losses and Infrastructure)

 

  • जनावरे: दुधाळ जनावरांच्या मृत्यूसाठी 37,000 रुपयांपर्यंत मदत.
  • कुक्कुटपालन: प्रति कोंबडी 100 रुपये मदत.
  • विहिरी: गाळ भरलेल्या विहिरींच्या नुकसानीसाठी प्रति विहीर 30,000 रुपयांची मदत.
  • घरे: पूर्णपणे नष्ट झालेली/पडझड झालेली घरे नव्याने बांधण्यासाठी मदत दिली जाणार आहे.
  • डोंगरी भागातील नागरिकांना नवीन घरांसाठी 10,000 रुपये अधिकची मदत.
  • इतर: दुकानदार, झोपडीधारक आणि गोठ्यांच्या नुकसानीसाठी 50,000 रुपयापर्यंतची मदत.
  • विद्यार्थी: पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सूट दिली जाईल.
  • पायाभूत सुविधा: रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांच्या भरपाईसाठी यापूर्वी 10,000 कोटी रुपये देण्यात आले असून, आता आणखी 15,000 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
  • तातडीच्या मदतीचा आढावा (Review of Immediate Aid)

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं की, भीषण परिस्थितीत सुरुवातीलाच तातडीची मदत म्हणून प्रत्येक बाधित कुटुंबाला 10,000 रुपये रोख आणि अन्नधान्य वाटप करण्यात आले. यासाठी राज्य सरकारने सुरुवातीला 22 कोटी रुपये खर्च करून तातडीची मदत पोहोचवली.

या पॅकेजमुळे आर्थिक आणि मानसिक त्रासात असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळेल आणि ते पुन्हा शेती उभी करू शकतील, अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com