जाहिरात

पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत पॅकेज जाहीर! नुकसान काय अन् किती मिळणार मदत? जाणून घ्या संपूर्ण जीआर

Maharashtra Government New GR For Farmers Relief Package: या निर्णयानुसार, पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज (Relief Package) आणि सवलती लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत पॅकेज जाहीर! नुकसान काय अन् किती मिळणार मदत? जाणून घ्या संपूर्ण जीआर

Maharashtra Heavy Rain Govt Relief Package:  जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या काळात झालेल्या नुकसानीची दखल घेऊन, सरकारने 253 तालुक्यांना 'पूरग्रस्त' (बाधित) तालुके म्हणून घोषित केले आहे. दि. 7 ऑक्टोबर २०२५ रोजी घेतलेल्या या निर्णयानुसार, पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज (Relief Package) आणि सवलती लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

२५३ तालुक्यांमध्ये मदत लागू:
खरीप हंगामाच्या दरम्यान राज्यातील २५३ तालुक्यांमध्ये शेतीतपकांचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरींचे नुकसान, मनुष्य व पशुहानी तसेच मोठ्या प्रमाणावर घर पडझड आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. विभागीय आयुक्तांकडून आणि कृषी विभागाकडून नुकसानीचा तपशील प्राप्त झाल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (SDRF) निकषांनुसार ही मदत दिली जाणार आहे.

पुणे-नाशिक महामार्गावरील तीनही टोल नाके बंद करा; आमदार सत्यजित तांबे यांची सरकारकडे मागणी

काय आहेत शासकीय मदतीचे निकष?

मनुष्यहानी आणि अपंगत्व: आपातग्रस्त मृत व्यक्तीच्या वारसांना 4 लाख अर्थसाहाय्य मिळेल. ६० टक्क्यांहून अधिक अपंगत्व आल्यास 2.50 लाख आणि जखमी व्यक्ती रुग्णालयात दाखल असल्यास 5,400 ते Rs 16,000 पर्यंत मदत मिळणार आहे. 

घर पडझड मदत: पूर्णतः नष्ट झालेल्या घरांसाठी (पक्क्या/कच्च्या) सपाट भागात 1.20 लाख, तर डोंगराळ भागात 1.30 लाख आणि अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी 6,500 (पक्के) ते 4,000 (कच्चे) पर्यंत मदत दिली जाईल. झोपडीसाठी  8,000 आणि गोठ्यासाठी Rs 3,000 ची मदत मिळणार आहे.

शेतकरी आणि शेतजमीन नुकसान:

शेतीतील पके: जिरायत पिकांसाठी 8,500 प्रति हेक्टर, बागायत पिकांसाठी 17,000 प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 प्रति हेक्टर (जास्तीत जास्त ३ हेक्टरच्या मर्यादेत) मदत मिळेल.

शेतजमीन नुकसान: नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढण्यासाठी 18,000 प्रति हेक्टर, तर जमीन खरडून गेली असल्यास (केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना) 47,000 प्रति हेक्टर मदत जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या लाखो शेतकरी आणि कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

इतर सवलती:

  • i) जमीन महसूलात सूट
  • ii) सहकारी कजाचे पुनगणठन
  • iii) शेतीशी तनगडीत कजाच्या वसुलीस स्थतगती (एक वषासाठी)
  • iv) ततमाही वीज तबलात माफी
  • v) परीक्षा शुल्हकात माफी व १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांची फी माफी.
     

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com