अमजद खान, प्रतिनिधी
Kalyan Crime News Today : वाहतूक पोलिसांनी छत्तीस गड राज्यातील नंबर प्लेट असलेली गाडी थांबविली. त्यावेळी कार चालकाने गाडी न थांबवता ती थेट वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली. पोलिसांनी कारचा पाठलाग करुन कार ताब्यात घेतली आणि कारची तपासणी केली. पोलिसांना या कारमध्ये 35 किलो गांजा आणि एक देशी कट्टा सापडला. फैज्जान शेख (नागपूर), समिर अली (नागपूर), आसिफ सैय्यद(नागपूर), शाहिद शेख (ठाणे) , शाहिद उर्फ बाबा शेख (नागपूर) , रविंद्र मिर्धा ( ओडिसा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून यात एका महिलेचाही समावेश आहे. ही महिला भिवंडी परिसरात राहणारी आहे. या प्रकरणी पोलीस अन्य 6 आरोपींचा शोध घेत आहेत.महात्मा फुले पोलीस स्टेशनचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
अटक केलेल्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार,या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी 8 जणांना बेड्या ठोकल्या आहे.तर इतर 6 आरोपींचा शोध सुरु आहे.अटक केलेल्या आरोपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिम भागातील नेताजी सुभाष चौक परिसरात वाहतूक शाखेचे दोन पोलीस कर्मचारी रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवत होते. त्याचदरम्यान एका पोलिसाने छत्तीस गड राज्यातील नंबर प्लेट असलेल्या एका कारला पकडलं.
नक्की वाचा >> Viral News: "आता बनेल मटण न्यूडल..", बिहारी नवरा अन् जपानी नवरी..लग्नाची पत्रिका पाहून तुम्हीही जाल चक्रावून!
35 किलो गांजा अन् देशी कट्टा सापडला
त्यानंतर वाहतूक पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने न थांबवता त्यांच्या अंगावर घातली आणि ते फरार झाले. पोलिसांनी या गाडीचा पाठलाग केला आणि चालकाला ताब्यात घेतले. या गाडीची तपासणी केली असता, त्यामध्ये 35 किलो गांजा आढळून आला.तसच एक देशी कट्टाही सापडला.
नक्की वाचा >> Akola News : शिक्षक बनला बडा एजंट..आंतरजातीय विवाह अनुदानासाठी मागितली लाच , 'असा' अडकला ACB च्या जाळ्यात!
कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे,एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बाळकृष्ण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन तपास पथके नेण्यात आली. पोलीस अधिकारी विकास मडके यांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात राज्यात सक्रीय असलेल्या गांजा तस्करी करणाऱ्या रॅकेटच्या उलगडा झाला आहे. या प्रकरणात नागपूर आणि भिवंडी या ठिकाणाहून एकूण 8 आरोपींना अटक केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world