माजी आमदार कपिल पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता

काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्याशी घनिष्ठ संबंध असतानाही कपिल पाटील यांनी काँग्रेसची वाट पकडली नव्हती. कपिल पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने स्थानिक काँग्रेस नेत्यांचं टेन्शन वाढलं. 

जाहिरात
Read Time: 2 mins

समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष, माजी आमदार कपिल पाटील यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली येथे प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, सुनील केदार, सतेज पाटील आदी नेते उपस्थित होते.

आमदार कपिल पाटील हे गोरेगाव मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेना पक्षातर्फे या मतदारसंघातून समीर देसाई प्रयत्नशील आहेत. तर काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते युवराज मोहिते उमेदवारीसाठी उत्सुक होते. 

(नक्की वाचा- काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे मविआमध्ये टोकाचे मतभेद? शरद पवार गट-ठाकरे गट वेगळी बैठक घेण्याची शक्यता)

काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्याशी घनिष्ठ संबंध असतानाही कपिल पाटील यांनी काँग्रेसची वाट पकडली नव्हती. कपिल पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने स्थानिक काँग्रेस नेत्यांचं टेन्शन वाढलं. 

शिक्षक आमदार असताना कपिल पाटील यांनी समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापना केली होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आपल्या पक्षाच्या बोधचिन्हांचे उद्घाटन त्यांनी केलं होतं. दुर्दैवाने मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कपिल पाटील यांना साथ न दिल्याने कपिल पाटील व उद्धव ठाकरे यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. 

(नक्की वाचा-  BJP First List : भाजपच्या पहिल्या यादीची वैशिष्ट्ये काय? 99 उमेदवार कोण? वाचा सविस्तर)

आता महाविकास आघाडीतून कपिल पाटील यांची पुढची वाटचाल असेल. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे कपिल पाटील महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळते की नाही हे पाहावं लागेल. 

Topics mentioned in this article