पुणेकरांसाठी आनंदाची (Good News for Punekar) बातमी आहे. पुण्यात लवकरच 4 नव्या वंदे भारत (Vande Bharat Train from Pune..) ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. पुण्यातून नुकत्याच काही दिवसांपूर्वी दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत. पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी तसेच मुंबई ते सोलापूर अशा 3 वंदे भारत रेल्वे गाड्या पुण्याला मिळाल्या आहेत. त्यातच अजून काही नव्या वंदे भारत गाड्यांची भर यात पडणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. पुणे ते शेगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद, पुणे ते बेळगाव या मार्गांवर वंदे भारत ट्रेन होणार सुरू होणार आहे.
काय आहे तिकीटदर..
पुणे ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पुणे या वंदे भारत एक्स्प्रेससाठी प्रत्येक प्रवाशाकडून 560 रुपये दर आकारले जात आहे. त्याशिवाय या एक्स्प्रेसमध्ये 52 Executive क्लास आहे. यात एका तिकीटाची किंमत 1135 पर्यंत आहे. पुणे ते कोल्हापूर एक्स्प्रेस बुधवार, शुक्रवार आणि रविवारी धावते.
नक्की वाचा - Raj Thackeray मनसे किती जागा लढवणार? आकड्यावरून राज ठाकरेंचे तळ्यात मळ्यात
वेगवान म्हणून ओळख असलेल्या वंदे भारत ट्रेनचं जाळ राज्यभरात पसरलं आहे. या ट्रेनमुळे प्रवासाचा अवधी कमी होतो. सध्या पुण्यातून हुबळी वंदे भारत सुरू आहे. पुणे ते हुबळी अंतर ५५७ इतकं असून यासाठी साडे आठ तासांचा अवधी लागतो. इतर ट्रेनच्या तुलनेत प्रवाशांचा वेळ सुमारे तीन तासांनी कमी होता.