जाहिरात

Raj Thackeray मनसे किती जागा लढवणार? आकड्यावरून राज ठाकरेंचे तळ्यात मळ्यात

MNS Chief Raj Thackeray राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना मनसे 250 पर्यंत जागा लढेल असे म्हटले होते.

Raj Thackeray मनसे किती जागा लढवणार? आकड्यावरून राज ठाकरेंचे तळ्यात मळ्यात
मुंबई:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आल्यानंतर सगळे राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने अद्याप जागावाटप जाहीर केलेले नाही. मनसेने यंदाची निवडणूक स्वबळावर लढण्याचं जाहीर केलं आहे. मनसेने आतापर्यंत काही उमेदवार देखील जाहीर केले आहेत. राज ठाकरे यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये त्यांनी महायुती सरकारवर टीका केली. 

नक्की वाचा : विधानसभेचं बिगुल वाजलं! तुमच्या मतदारसंघात मतदान आणि मतमोजणी कधी? वाचा वेळापत्रक

महाराष्ट्र सरकारने मुंबईतील प्रवेशद्वारावर असलेल्या टोलनाक्यांवर चारचाकी गाड्यांना आणि इतर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला. या टोलमाफीचे श्रेय राज ठाकरे यांनी आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटले की, आता श्रेय घेण्यासाठी अनेकजण येतील पुढे मात्र त्यांचा कधीच संबंध आलेला नाही. हे आंदोलन कोणी केलं आणि त्यात सातत्य कोणाचं होतं हे जगाला माहिती आहे. राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, अनेकांनी शब्द दिले होते की टोलनाके बंद करतोय नंतर सांगितले की त्यांचे पैसे  पूर्ण झाले नाहीयेत त्यामुळे सुरू करावं लागतंय.  सरकारने घेतलेल्या निर्णयाचं लोकांनाही समाधान आहे. राज ठाकरे यांनी म्हटले की आतापर्यंत टोलनाक्यावरून किती पैसे येत आहे आणि कुठे जात आहे, हे कळायला मार्गच नव्हता कारण टोलनाक्यांवरचा व्यवहार रोखीने केला जात होता. यावर सगळे राजकीय पक्ष गप्प बसले होते अशी टीका राज ठाकरे यांनी केली.  मनसे आंदोलनाबाबतीत धरसोड वृत्ती करत असल्याचा आरोप केला जातो, यावर बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, हे आंदोलन कोणी केलं आणि त्यात सातत्य कोणाचं होतं हे जगाला माहिती आहे. 

नक्की वाचा : Voter ID डाऊनलोड कसा करणार? वाचा सोपी पद्धत, काही मिनिटांमध्येच होईल काम

लाडकी बहीण योजनेवरून टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर लाडकी बहीण योजनेवरून सडकून टीका केली. लोकांना सरकार 5-7 हजार रुपये फुकट वाटू शकत नाही असे राज यांनी म्हटले आहेत. हे पैसे तुमच्या घरचे आहेत का ? असा सवाल करत ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. एकीकडे सरकारकडे तिजोरीत पैसे नाहीये आणि दुसरीकडे वाटावाटी सुरू आहे अशाने राज्य कंगाल होईल असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 

मनसे किती जागा लढणार?

राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना मनसे 250 पर्यंत जागा लढेल असे म्हटले होते. आजच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी कोणताही आकडा सांगितला नाही. मात्र त्यांनी दावा केला की इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत मनसे सगळ्यात जास्त जागा लढेल. मनसेने 2009, 2014 च्या निवडणुकाही लढल्या होत्या असे राज ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज ठाकरेंच्या पक्षाने 2019 सालची लोकसभा निवडणूक लढवलीच नव्हती.  2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने एकूण 110 जागांवर निवडणूक लढवली होती. गेल्या निवडणुकीत मनसेचा फक्त एकच आमदार निवडून आला होता. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
Maharashtra Vidhan Sabha Election : मायावती विधानसभा स्वबळावर लढवणार; कोणाला फटका?
Raj Thackeray मनसे किती जागा लढवणार? आकड्यावरून राज ठाकरेंचे तळ्यात मळ्यात
Eknath-Shinde-Presents-Mahayuti-Govt-Report-Card-Criticizes-Uddhav-Thackeray
Next Article
'विरोधक गडबडले, बिथरलेत! त्यांनी विरोधी पक्षनेत्याचा चेहरा ठरवावा'