Gadchiroli News: गडचिरोली हादरलं! आई-वडील होते शेतात, चार मुलं सती नदीवर गेली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं

गडचिरोली जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव येथे सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार विद्यार्थ्यांपैकी तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Sati River Water Drowning News

मनिष रक्षमवार, प्रतिनिधी 

Three Students Died In Sati River : गडचिरोली जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव येथे सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार विद्यार्थ्यांपैकी तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. एक विद्यार्थी सुदैवाने बचावला आहे.या दुर्घटनेत लक्ष्मण सुन्हेर दूधकवर (6), कुणाल रमेश दूधकवर (5) आणि मोहित हिवराज सराटे (11) या तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

चारपैकी तिघे जण पाण्यात बुडाले 

मिळालेल्या माहितीनुसार, कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव येथे आज दुपारी ही दुर्दैवी घटना घडली.आई-वडील धान रोवणीच्या कामासाठी शेतात गेले असता,गावातील चार विद्यार्थी जवळच असलेल्या सती नदीत आंघोळीसाठी गेले होते.मात्र,नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने चारपैकी तिघे जण पाण्यात बुडाले.

Advertisement

नक्की वाचा >> Dombivli News: डोंबिवलीच्या 'या' मुख्य रस्त्यांची चाळण, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिकांना होतोय प्रचंड त्रास

पुराडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि..

तिन्ही विद्यार्थी खेडेगाव येथील रहिवासी असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होते. घटनेची माहिती मिळताच शोध पथक तसेच पुराडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली.या घटनेमुळे खेडेगाव परिसरावर शोककळा पसरली असून चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नक्की वाचा >> Shocking: पालकांनो सावधान! पोटदुखीचा असह्य त्रास, डॉक्टरांकडे नेताच सत्य समजलं; पोटात तब्बल...