जाहिरात

Shocking: पालकांनो सावधान! चिमुकल्याला पोटदुखीचा असह्य त्रास, डॉक्टरांकडे नेताच सत्य समजलं; पोटात तब्बल...

बालरोगतज्ज्ञ डॉ. बादशाह खान यांनी तपासणीनंतर आतड्यात अडथळा निर्माण झाल्याचा संशय व्यक्त करून तातडीने एक्स-रे आणि सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला.

Shocking: पालकांनो सावधान! चिमुकल्याला पोटदुखीचा असह्य त्रास, डॉक्टरांकडे नेताच सत्य समजलं;  पोटात तब्बल...

इरफान सय्यद, मीरा रोड:

 Mira Road Shocking News:  लहान मुलांच्या हातात खेळणी देताना पालकांचे दुर्लक्ष किती महागात पडू शकते याचा प्रत्यय देणारी धक्कादायक घटना मीरा रोड येथे घडली आहे. मीरा रोड येथील एका चिमुकल्याला पोटदुखी, उलट्यांचा असह्य त्रास होऊ लागला. पालकांनी त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर जे सत्य समोर आले त्याने डॉक्टरांसह सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. नेमकं या चिमुकल्यासोबत काय घडलं? वाचा सविस्तर...

पोटदुखी आणि उलट्यांचे धक्कादायक कारण! 

खेळण्यातील चुंबकीय धातूचे अनेक तुकडे गिळल्यामुळे गंभीर अवस्थेत असलेल्या १० वर्षीय मुलावर मिरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या तातडीच्या उपचारांमुळे मुलाचा जीव वाचवण्यात यश आले असून, आतड्याला छिद्र पडण्याचा आणि गंभीर संसर्ग होण्याचा धोका टळला आहे.  पोटदुखी आणि वारंवार उलट्या होत असल्याने मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला ही सामान्य पोटदुखी असल्याचा अंदाज होता. मात्र तपासणीनंतर मुलाने खेळताना मोठ्या प्रमाणात लहान चुंबकीय धातूचे तुकडे गिळल्याचे स्पष्ट झाले.

रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) ने ग्रस्त असून अशा मुलांमध्ये अन्न नसलेल्या वस्तू तोंडात टाकण्याची सवय आढळते. बालरोगतज्ज्ञ डॉ. बादशाह खान यांनी तपासणीनंतर आतड्यात अडथळा निर्माण झाल्याचा संशय व्यक्त करून तातडीने एक्स-रे आणि सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला.

Shirdi News: साईबाबांच्या चरणी रेकॉर्डब्रेक दान! फक्त 3 दिवसात 'इतक्या' कोटींची देणगी; आकडा वाचून थक्क व्हाल

डॉक्टरांच्या तत्परतेने मोठा धोका टळला! 

तपासणीत लहान आतड्यात अनेक चुंबकीय तुकडे अडकून पडल्याचे स्पष्ट झाले. यानंतर डॉ. भावेश दोशी आणि डॉ. प्रदीप शेनॉय यांनी तातडीची शस्त्रक्रिया करून लहान आतड्यात अडकलेले सर्व चुंबकीय तुकडे सुरक्षितपणे बाहेर काढले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे आतड्याचे कायमस्वरूपी नुकसान टळले आणि मुलाची प्रकृती स्थिर झाली. उपचारानंतर आठवडाभराने त्याला घरी सोडण्यात आले. 

डॉ. बादशाह खान यांनी सांगितले की, एकापेक्षा जास्त चुंबकीय तुकडे गिळल्यास ते आतड्याच्या वेगवेगळ्या भागांना एकमेकांकडे खेचतात. त्यामुळे आतडे अडकणे, रक्तपुरवठा बंद होणे, आतड्याला छिद्र पडणे आणि गंभीर संसर्ग होण्याचा धोका असतो. डॉक्टरांनी पालकांना आवाहन केले आहे की, मॅग्नेट असलेली खेळणी, मॅग्नेटिक बीड्स, बटण बॅटऱ्या, नाणी आणि इतर लहान धातूच्या वस्तू मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवाव्यात. अशा वस्तू गिळल्याचा संशय आल्यास वेळ न दवडता तातडीने रुग्णालयात जावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इंदूर- मुंबई फक्त 8 तासात! 309KMचा रेल्वेमार्ग, मध्यप्रदेश- महाराष्ट्रातील 8 जिल्हे जोडणार; काय आहे मेगाप्लॅन?

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com