जाहिरात

Petrol-Diesel Supply: राज्यात पेट्रोल-डिझेलची सद्यस्थिती काय आहे? मंत्री छगन भुजबळांनी दिली सविस्तर माहिती

Fuel Supply in Maharashtra: महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून राज्यात कोणतीही इंधनटंचाई नाही, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

Petrol-Diesel Supply: राज्यात पेट्रोल-डिझेलची सद्यस्थिती काय आहे? मंत्री छगन भुजबळांनी दिली सविस्तर माहिती

 Fuel Supply in Maharashtra: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य आणि तणावाच्या परिस्थितीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर इंधनटंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर पसरवल्या जात आहेत. मात्र, या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसून महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची अधिकृत माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील इंधन पुरवठ्याची सद्यस्थिती स्पष्ट केली आणि नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले.

मे महिन्यात इंधन विक्रीत 20 टक्क्यांची वाढ

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई भासणार नाही. मात्र, टंचाईच्या भीतीपोटी अनेक ठिकाणी नागरिकांनी गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी करून त्याची साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे. या अनावश्यक खरेदीमुळेच चालू मे महिन्यात नेहमीच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 20 टक्के अधिक पेट्रोल-डिझेलची विक्री झाली असल्याची आकडेवारी त्यांनी समोर आणली. नागरिकांनी अशा प्रकारे भीतीपोटी अतिरिक्त साठा करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

(नक्की वाचा-  LPG Cylinder: घरातील सिलेंडर 25 दिवसांच्या आत संपला तर काय कराल? 3 पर्याय ठरतील फायदेशीर)

सरकार इंधन पुरवठा करण्यास पूर्णपणे सक्षम

प्रशासकीय आणि सरकारी यंत्रणांच्या तयारीबद्दल बोलताना भुजबळ यांनी नागरिकांना आश्वस्त केले की, "पंतप्रधान, केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रत्येक नागरिकाला पुरेशा प्रमाणात आणि विनाव्यत्यय इंधन उपलब्ध करून देण्यास पूर्णपणे सक्षम आहेत. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या अफवांना बळी पडून किंवा भीतीच्या वातावरणामुळे वाहनांमध्ये अथवा घरांमध्ये अतिरिक्त साठा करण्याची कोणतीही आवश्यकता नाही."

(नक्की वाचा-  Beed News: लेकरं बसमध्ये अन् आई प्रियकरासोबत फरार; खिशात ठेवली चिठ्ठी, तर आजोबांचा प्रश्न ऐकून पोलीस चक्रावले)

संयम बाळगण्याचे आवाहन

पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील गेल्या काही दिवसांतील इंधन विक्रीची अधिकृत आकडेवारीही माध्यमांसमोर मांडली. इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी नागरिकांनी संयम बाळगावा, केवळ आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे आणि शासकीय प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी शेवटी केले.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com