राहुल कुलकर्णी, पुणे
राज्यभरात तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. उष्णतेमुळे मार्च महिन्यातच नागरिक हैराण झाले आहेत. पुणे महापालिकेने पुणेकरांना दिलासा देण्यासाठी उद्याने आता रात्री 9 वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून शालेय सुट्ट्या देखील सुरु झाल्या आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेने सार्वजनिक उद्यानांची वेळ एक तास वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रात्री 8 वाजता बंद होणारी उद्याने आता रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. तर महापालिकेकडून प्रत्येक उद्यानांची तपासणी देखील केली जाणार आहे.
(नक्की वाचा- Heat Wave : उष्णतेची लाट कधी आणि कशी जाहीर केली जाते? काय काळजी घ्यावी)
पुणे महापालिकेने प्रत्येक उद्यानाची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र टीम नियुक्त केली आहे. उद्यानात जी काम करण्याची गरज आहे ती सगळी कामे करण्यात येणार असून उद्यानांची डागडुजी देखील केली जाणार आहे. पुणे शहरात महापालिकेची 220 हून अधिक सार्वजनिक उद्याने असून ही सगळी उद्याने रात्री 9 पर्यंत सुरू राहणार आहेत.
(नक्की वाचा - Vidhan Parishad : मुख्यमंत्र्यांचे मित्र आता दिसणार विधान परिषदेत, जोशींसह आणखी कुणा-कुणाला संधी?)
उष्माघात टाळण्यासाठी पुढील गोष्टींची काळजी घ्या
- भरपूर पाणी प्या
- जरी तहान लागली नसली तरी दिवसभरात नियमित अंतराने पाणी प्या.
- हलके आणि सैलसर कपडे परिधान करा
- उष्ण हवामानात सुती कपडे घाला.
- थेट उन्हापासून बचाव: शक्यतो दुपारच्या वेळेस (११ ते ४) बाहेर जाणे टाळा.
- शारीरिक श्रम कमी करा: प्रखर उन्हात व्यायाम किंवा काम करणे टाळा.
- योग्य आहार घ्या: फळांचे रस, नारळ पाणी, ताक यांचा समावेश आहारात करा.
- उष्माघात ही गंभीर स्थिती असून वेळीच उपचार न केल्यास जीवघेणा ठ