कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील औद्योगिक विकासाला नवी दिशा देणार असून या तिन्ही जिल्ह्यांमध्ये ग्लोबल केपेबिलिटी सेंटर (जीसीसी) स्थापन करण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले. आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी याविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री डॉ. उदय सामंत बोलत होते. यावेळी सदस्य शशिकांत शिंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
उद्योगमंत्री डॉ. सामंत म्हणाले की, महाराष्ट्राची जीसीसी पॉलिसी ही देशातील सर्वोत्तम पॉलिसी ठरली आहे. पूर्वी जीसीसीचे मर्यादित युनिट्स देशात होते. 2021 मध्ये 12 युनिट्स तर 2025 मध्ये 19 युनिट्स होते. राज्य शासनाचा उद्देश 400 जीसीसी युनिट्सपर्यंत पोहोचण्याचा असून, त्यात पश्चिम महाराष्ट्राला मोठे प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर, सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यांना जीसीसी विकासासाठी सेकंड आणि थर्ड टियर भागात प्राधान्य मिळणार आहे. कोल्हापूरची एअर कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, वाढती औद्योगिक क्षमता आणि आयटी पार्कची मागणी लक्षात घेता येथे जीसीसीसाठी मोठी संधी आहे. सांगली–सातारा येथेही जमीन उपलब्धता, ट्रायॅंग्युलर लोकेशन आणि उद्योगस्नेही वातावरण हे मोठे फायदे आहेत. मोठी डेटा सेंटर क्लस्टर्स देखील या प्रकल्पात समाविष्ट जातील, असे त्यांनी सांगितले.
(नक्की वाचा- साईबाबा आणि बालाजी भक्तांसाठी खूशखबर! शिर्डी-तिरुपती एक्सप्रेस सुरु, राज्यात 11 ठिकाणी थांबणार गाडी)
पुढील एका महिन्यात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित केली जाईल. त्यानंतर जीसीसी स्थापनेबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.
ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर म्हणजे काय?
ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर हे एका बहुराष्ट्रीय कंपनीने (MNC) खर्च वाचवण्यासाठी, तसेच जागतिक स्तरावरची प्रतिभा आणि तंत्रज्ञान यांचा फायदा घेण्यासाठी त्यांच्या जागतिक व्यवसायांना मदत करण्यासाठी स्थापन केलेली पूर्ण मालकीची नजीकची युनिट असते. ही केंद्रे कंपनीच्या मालकीची असतात आणि त्यांचे पूर्ण नियंत्रण कंपनीच्या मुख्यालयाप्रमाणेच असते.
(नक्की वाचा- Dombivli News: कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! कोळेगावमध्ये 21 डिसेंबरपर्यंत वाहतूक मार्गात बदल)
GCC ची प्रमुख वैशिष्ट्ये
GCC हे केवळ बॅक-ऑफिस म्हणून काम करत नाही. तर इनोव्हेशन, कौशल्य विकासाचे केंद्र म्हणून विकसित झाले आहेत. ही केंद्रे कंपनीच्या मालकीची असल्याने, कंपनीच्या धोरणे, कार्यप्रणाली आणि डेटावर पूर्ण गोपनीयता आणि नियंत्रण टिकवून ठेवता येते.