Kalyan Viral Video : कल्याण जवळील आंबिवली परिसरात नशेखोराकडून नागरिकांच्या घरांवर सुतळी बॉम्ब फेकल्याची घटना नुकतीच घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता नागरिकांसमोर नव्या संकटानं डोकं वर काढलं आहे. काही नशेखोरांनी सतीश यादव नावाच्या व्यक्तीच्या घरात जाऊन त्याला नाहक त्रास देत दिला. हा संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नशेखोरांच्या गैरवर्तणुकीमुळे नागरीक त्रस्त झाले आहे.
नशेखोरांमुळे कल्याणच्या नागरिकांना नाहक त्रास
मिळालेल्या माहितीनुसार, सतिशने पोलिसांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. दरम्यान, नशेखोरांच्या विरोधात पोलिसांनी ठोस कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. कल्याणमधील आंबिवलीनजीक पाटील नगर हा परिसर आहे. या परिसरात नशेखोर नागरिकांना त्रास देतात. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात काही नशेखोर नागरिकांच्या घरावर सुतळी बॉम्ब टाकत होते. त्यामुळे या परिसरात दहशत निर्माण झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली, याची माहिती समोर आली नाही.
— Naresh Shende (@NareshShen87640) March 22, 2026
नक्की वाचा >> Maharashtra Kesari Final: एकाच गुरुचे 2 शिष्य भिडले, नाशिकचा हर्षवर्धन सदगिर ठरला ‘डबल महाराष्ट्र केसरी'
व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून हे प्रकरण समोर आलं. सतिश नावाचा व्यक्ती पोलिसांकडे मदत मागत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतं. त्याचदरम्यान काही नशेखोर त्याला धरून ठेवतात. तो त्यांना त्या परिसरातून निघून जाण्यास सांगतो. हा व्हिडीओ व्हायरल होताच नागरिकांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली. आरोपींविरोधात ठोस कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world