जाहिरात

मुंबई-गोवा महामार्गाची जबाबदारी श्रीकांत शिंदेंकडे द्या, शिंदे गटाकडून रविंद्र चव्हाणांना डिवचण्याचा प्रयत्न

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या 15 वर्षापासून रखडले आहे. हे काम रखडल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टीका केली होती.

मुंबई-गोवा महामार्गाची जबाबदारी श्रीकांत शिंदेंकडे द्या, शिंदे गटाकडून रविंद्र चव्हाणांना डिवचण्याचा प्रयत्न

अमजद खान, कल्याण

मागील 15 वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाची जबाबदारी इन्फ्रा मॅन खासदार श्रीकांत शिंदे यांना द्या म्हणजे हा प्रकल्प मार्गी लागेल, अशी मागणी डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही जबाबदारी घ्यावी, यासाठी पत्र देखील देण्यात आले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना शिंदे गटाकडून डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे.  

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या 15 वर्षापासून रखडले आहे. हे काम रखडल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टीका केली होती. या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी कंबर कसली आहे. महामार्गाच्या कामाची प्रत्येक महिन्याला जाऊन ते पाहणी करत आहेत. 

(नक्की वाचा - "मी ढेकणाला आव्हान देत नाही", उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर नाव न घेता टीका)

Shivsena Shinde Group

Shivsena Shinde Group

लोकसभा निडणुकीच्या आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गावरून सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यानंतर मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यात येईल, असं रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं होतं. काम सुरु असताना शिंदे गटाकडून आता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या कामाची जबाबदारी खासदार शिंदे यांच्याकडे देण्याची मागणी केली आहे. 

(नक्की वाचा- 'ठाकरे 288 जागा लढले तर 160 जागा जिंकतील' राऊतांचे सुचक वक्तव्य)

मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकर व्हावे यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांना द्यावी. या संदर्भात शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, शहर प्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक विश्वनाथ  राणे, पधिकारी रमांकात देवळेकर, संतोष चव्हाण, विवेक खामकर यांनी हे पत्र दिले आहे. या मागणीनंतर शिवसेना भाजप सत्तेत असताना अशा प्रकारची मागणी शिंदे गटाकडून केली गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आता या मागणीवर रविंद्र चव्हाण काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com