Gold-Silver Rates: सोन्या-चांदीच्या गगनाला भिडलेल्या किमतींना आता अचानक ब्रेक लागला आहे. मध्यपूर्वेतील तणाव वाढत असतानाही जागतिक कमॉडिटी मार्केटमध्ये (Comex) झालेल्या मोठ्या विक्रीमुळे मौल्यवान धातूंचे दर कोसळले आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) आणि MCX च्या आकडेवारीनुसार, गेल्या सात दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
आठवडाभरातील दरातील बदल
24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर मागील शुक्रवारी 1 लाख 58 हजार 399 रुपये इतका होता. जो आज 1 लाख 47 हजार 218 रुपयांवर आला आहे. म्हणजेच सोन्याचा दरात आठवडा भरात 11,100 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरातही आठवडाभरात 28,100 रुपयांची घसरण झाली आहे. मागील आठवड्यात चांदीचा दर प्रति किलो 2 लाख 60 हजार 488 रुपये इतका होता. जो आज 2 लाख 32 हजार 362 रुपयांवर आला आहे.
(नक्की वाचा- Pune Petrol Price Hike: पुण्यात पेट्रोलच्या दरात मोठी वाढ; इराण-इस्रायल युद्धाचा पुणेकरांना फटका)
कमॉडिटी मार्केट आणि कॉमेक्स अपडेट
जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर 2.47% (113.70 डॉलर) ने घसरून 4,492 डॉलर प्रति औंसवर आले आहेत. चांदीमध्ये 4.78% ची मोठी घसरण होऊन ती 67.81 डॉलर प्रति औंसवर व्यापार करत आहे. दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतीत 2.54 डॉलरची वाढ झाली असून ते 98.09 डॉलरवर पोहोचले आहे.
स्थानिक सराफा बाजारातील दर
तुमच्या शहरातील ज्वेलरी दुकानांमध्ये आजचे दर खालीलप्रमाणे असू शकतात.
- 24 कॅरेट सोने: 1,45,970 रुपये प्रति 10 ग्रॅम
- 22 कॅरेट सोने: 1,33,800 रुपये प्रति 10 ग्रॅम
- 18 कॅरेट सोने: 1,09,480 रुपये प्रति 10 ग्रॅम
- चांदी (999 शुद्धता): 2,32,364 रुपये प्रति किलो
(नक्की वाचा- Ashok Kharat: अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड; मविआ सरकारही भोंदूबाबावर मेहेरबान असल्याचे समोर)
दर का कमी झाले?
तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किमती खूप जास्त वाढल्याने गुंतवणूकदारांनी नफा वसुली सुरू केली आहे. तसेच, डॉलरच्या तुलनेत इतर चलनांमध्ये होत असलेले बदल आणि जागतिक बँकांच्या धोरणांमुळे सोन्यावरील दबाव वाढला आहे. मात्र, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती भविष्यात पुन्हा महागाई वाढवू शकतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world