रेवती हिंगवे, पुणे
पुण्यात नाकाबंदीदरम्यान 138 कोटी रुपयांचं सोनं पोलिसांना सापडलं होतं. मौल्यवान धातूंसाठी अधिकृत लॉजिस्टिक कंपनीद्वारे सोन्याची वाहतूक केली जात होती. कंपनीने आधीच निवडणूक आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली होती.
पोलिसांनी याबाबत कोणतीही जप्तीची कारवाई केलेली नाही. पुणे- सातारा रोड परिसरात टेम्पोची झडती घेत असताना हे कोट्यवधींचं सोनं सापडलं होतं. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे. आयकर विभागाचे अधिकारी सोन्याचा स्त्रोत आणि कुठे जात होते हे तपासत आहेत.