
राहुल कुलकर्णी, पुणे
गरीब आणि गरजू नागरिकांना सणासुदीचा काळ आनंदात जावा यासाठी सरकारने 'आनंदाचा शिधा' ही योजना सुरु केली होती. मात्र ही योजना बंद करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवशी गरीब नागरिकांना सरकारकडून मिळणारे खाद्यपदार्थ मिळणार नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आर्थिक भर वाढल्याने सरकारने ही योजना बंद केल्याचं बोललं जात आहे. महायुती सरकारने 2022 मध्ये ही योजना सुरु केली होती. मात्र ही योजना बंद केल्याने यंदाचा गुढीपाडवा, गणपती आणि दिवाळी या सारख्या सणांना सरकारकडून मिळणारे खाद्यपदार्थ मिळणार नाहीत. त्यामुळे पात्र नागरिकांना या वस्तू बाजारभावाप्रमाणेच खरेदी कराव्या लागणार आहेत.
(नक्की वाचा- हातावर मेहंदी, सूटकेसमध्ये मृतदेह; काँग्रेस नेत्याच्या निर्घृण हत्येने खळबळ)
काय आहे आनंदाचा शिधा योजना?
'आनंदाचा शिधा' योजनेत या सणासुदीच्या काळात रेशन कार्ड धारकांना 100 रुपयांत एक किलो या प्रमाणात तेल, रवा, चणाडाळ आणि साखर दिली जाते. जवळपास 1 कोटी 60 लाख पात्र लाभार्थ्यांना या किटचे वाटप केले जात होते. त्यासाठी प्रत्येक सणाला 350 कोटींची तरतूद करण्यात येत होती.
(नक्की वाचा- Hyperloop Track : अवघ्या अर्ध्या तासात 350 किमीचा प्रवास; देशातील पहिला हायपरलूप टेस्टिंग ट्रॅक तयार)
2022 मध्ये ही योजना सुरु करण्यात आली होती. त्यावेळी या योजनेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यानंतर 2023 मध्ये गुढीपाडवा, गणपती आणि दिवाळी सणाला, तर 2024 मध्ये या सणांसोबतच अयोध्या श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानेही आनंदाच्या शिध्याचे वाटप करण्यात आले होते. मात्र ही लोकप्रिय योजना सरकारच्या तिजोरीवर भार पडत असल्याने बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world