जाहिरात

Mumbai Train Video : सीएसएमटी-कर्जत ट्रेनमध्ये घडली संतापजनक घटना, प्रवाशांमध्ये पसरली घबराट, व्हिडीओ व्हायरल

मुंबई लोकल ट्रेनमधील एक धक्कादायक आणि संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे.

Mumbai Train Video : सीएसएमटी-कर्जत ट्रेनमध्ये घडली संतापजनक घटना, प्रवाशांमध्ये पसरली घबराट, व्हिडीओ व्हायरल
Mumbai Local Train Video Viral
मुंबई:

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Mumbai Local Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमधील एक धक्कादायक आणि संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे. शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 2.45 वाजता कर्जत फास्ट ट्रेन सुटली. या ट्रेनमधील दिव्यांग डब्यात असलेल्या दिव्यांग प्रवाशावर 5 ते 6 जणांच्या टोळक्याने हल्ला केला.दिव्यांग  प्रवाशाला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, भायखळा स्थानकावरून चढलेल्या काही प्रवाशांनी दोन्ही पायांनी पोलिओग्रस्त असलेल्या व्यक्तीला लक्ष्य केले. हल्लेखोरांनी त्या व्यक्तीला खाली पाडून बेदम मारहाण केली. तसेच त्याला दरवाज्याजवळ ओढत नेले.ही घटना दादर ते कुर्ला दरम्यान घडली.मारहाण करणारे आरोपी कुर्ला स्थानकावर उतरून पसार झाले. तर जखमी दिव्यांग प्रवासी घाटकोपर येथे उतरला.विशेष म्हणजे या गंभीर घटनेनंतरही कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही.

नक्की वाचा >> Mhada Lottery : म्हाडा मुंबई मंडळातर्फे 2640 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर, 'या' तारखेला होणार 'गो लाईव्ह'

इथे पाहा मुंबई लोकलमधील व्हायरल व्हिडीओ 

या घटनेमुळे रेल्वे सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दिव्यांगांसाठी राखीव डब्यांमध्ये अनधिकृत प्रवाशांचा वावर कसा होतो. तसेच  आरपीएफ आणि  जीआरपी यांची उपस्थिती कुठे आहेत?असा सवालही प्रवाशांनी उपस्थित केला आहे. दरम्यान,संबंधित आरोपींविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.तसेच दिव्यांग डब्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. 

नक्की वाचा >> Kalyan Dombivali News : डोंबिवलीत ठाकरे गटाला तर कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, काय घडलंय?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com