
मनोज सातवी, पाघलर
पालघरमध्ये गुटखा माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. गुटखा माफियांनी कारवाई करायला आलेल्या पोलिसांवर हल्ला चढवल्याची घटना समोर आली आहे. मात्र पोलिसांनी देखील मोठ्या शिताफीने दोन कार आणि अडीच लाख रुपयांचा गुटखा देखील जप्त करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash : 'गणपती बाप्पामुळे वाचले', मृत्यूला चकवा देणाऱ्या महिलेचा थरारक अनुभव )
मनोर पोलिसांनी वरई - सफाळे मार्गावर सापळा रचून केलेल्या कारवाईत गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन कार जप्त केल्या आहेत. तर अडीच लाख रुपयांचा गुटखा हस्तगत केला आहे. एकामागून एक अशा तीन संशयास्पद कार पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता एका कार चालकाने पोलिसांच्या पथकातील वाहनाला धडक देत पळून जाण्याचा प्रयत्न केला.
(नक्की वाचा- Dhule News : समोसा खाल्ल्याने महिलेची प्रकृती बिघडली, नवऱ्याने समोसा तपासला तेव्हा धक्काच बसला)
परंतु पोलिसांनी त्यांच्या पथकातील दुसरे वाहन आडवे टाकत दोन कार आणि एका कार चालकाला ताब्यात घेतले. दरम्यान एक कार चालक कार घेऊन फरार झाला आहे. त्यामुळे, पोलिसांच्या वाहनाला धडक देण्या इतपत पालघरमध्ये गुटखा माफियायांची हिम्मत वाढली का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तर, दुसरीकडे पालघर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी पदभार स्विकारल्यापासून अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याने सुस्तावालेलं पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आल्याने अवैध व्यवसाईकांचे चांगलेच धाबे दानाणाले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world