जाहिरात

नोकरीसाठी दुबईला गेली पण थेट पाकिस्तानात पोहोचली, तब्बल 23 वर्षानंतर जे घडलं ते...

एका एजंटने त्यांना दुबईत काम देतो असे सांगितले. त्या तयार झाल्या. ही घटना 2001 सालची आहे.

नोकरीसाठी दुबईला गेली पण थेट पाकिस्तानात पोहोचली, तब्बल 23  वर्षानंतर जे घडलं ते...
मुंबई:

हमीदा बानो. या मुंबईच्या कुर्ला इथल्या राहणाऱ्या. 23 वर्षा पूर्वी त्या कामासाठीम्हणून दुबईला रवाना झाल्या. पण त्या दुबईत पोहचल्याच नाहीत. त्या थेट पाकिस्तानात पोहोचल्या. पाकिस्तानात त्या अडकून पडल्या. त्यांना भारतात येण्याची इच्छा होती पण त्या परत येऊ शकत नव्हत्या. अशा वेळी एक पाकिस्तानी युट्यूबर त्यांच्या मदतीला धावून आला. त्याने त्यांची संपूर्ण कथाचं युट्यूबवर टाकली. त्यानंतर जी काही चक्र फिरली की हमीदा बानो यांनी स्वप्नातही विचार केला नसेल अशी घटना तब्बल 23 वर्षानंतर घडली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कुर्ल्यात हमीदा बानो या राहात होत्या. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न होता. आर्थिक स्थिती हालाकीची होती. अशा वेळी त्यांनी परदेशात कामाला जाण्याचा निश्चय केला. त्यांनी दोहा, कतार इथं तब्बल 9 वर्ष काम केलं. त्यातून त्यांनी मुलांचे शिक्षण केलं. 9 वर्षांनी त्या मुंबईत परत आल्या. आता मुलांचे लग्न करायचे होते. म्हणून त्यांनी दुबईला कामाला जाण्याचा निर्णय घेतला. त्या दुबईल कामासाठी गेल्या. सहा महिने काम केल्यानंतर त्या परतल्या. परत आल्यानंतर त्यांनी मुलांची लग्नही करून दिली. आता प्रश्न होता तो घरात. मुलांसाठी घर घेतलं पाहीजे म्हणजे आपली जबाबदारी संपली असा त्यांनी विचार केला. त्यानंतर परत त्या दुबईला जाण्यासाठी निघाल्या. 

ट्रेंडिंग बातमी - आई अन् मुलगा लाइफ जॅकेटसाठी बोटीच्या खाली गेले, पण..; मुंबई बोट अपघाताचं धक्कादायक वास्तव

एका एजंटने त्यांना दुबईत काम देतो असे सांगितले. त्या तयार झाल्या. ही घटना 2001 सालची आहे.  दुबईला जाण्यासाठी त्या निघाल्या. पण त्या दुबईला पोहोचल्याच नाहीत. त्या थेट पाकिस्तानात पोहोचल्या. त्यांना एजंटनं फसवलं होते. आता त्या पाकिस्तानात चांगल्याच फसल्या होत्या. त्यांच्या समोर काहीच पर्याच नव्हता. त्यामुळे त्या मिळेल ते काम पाकिस्तानात करत होत्या. त्यांना भारतात परत यायचं होतं. पण कोणताही मार्ग सापडत नव्हता. एक एक करत 23 वर्ष निघून गेली. पण त्यांची घरवापसी झालीच नाही. अशा वेळी त्यांच्या मदतीला वलीउल्लाह मारूफ हा तरूण धावून आला. 

ट्रेंडिंग बातमी - फिरायला आले, होत्याचं नव्हतं झालं... बोट दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा अंत

हमीदा बानो पाकिस्तानात ज्या ठिकाणी राहत होत्या त्याच्या शेजारी वलीउल्लाह मारूफ राहात होता. ते एक युट्यूबर होता. त्याने हमीदा यांची माहिती घेतली. त्यांची पुर्ण कहाणी ऐकून घेतली. त्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ युट्यूबवर टाकला. योगायोग असा की हा व्हिडीओ कुर्ल्यातीलच एक युट्यूबर असलेल्या खलफान शेख यांनी पाहिला. त्यानंतर खऱ्या अर्थाने हमीदा बानो यांच्या सुटकेसाठी चक्र फिरली. पण कहानी इथच संपली नाही. 

ट्रेंडिंग बातमी - Boat accident:'तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे ना, ऊठ ना' आईच्या मृतदेहासमोर लेकीचा हंबरडा

2022 सालची ही गोष्ट आहे. ज्या वेळी  खलफान शेख यांनी हमीदा यांची स्टोरी युट्यूबवर पाहिली. त्यात त्यांनी आपण मुंबईच्या कुर्ल्यातील रहिवाशी असल्याचं सांगितलं. त्यानंतर  खलफान शेख याने पाकिस्ताने युट्यूबरबरोबर संपर्क साधला. त्याच्याकडू सर्व डिटेल्स मागवल्या. त्यानंतर  खलफान शेख याने हमीदा यांची माहिती वॉट्सअपवर टाकली. त्यांचा फोटो ही टाकला. त्यानंतर पुढच्या दोन तासात हमीदा यांच्या नातेवाईकांनी  खलफान शेख याला संपर्क केला. त्यानंतर त्यांना भारतात आणण्याची प्रक्रीया सुरू झाली. 

ट्रेंडिंग बातमी - संसदेत राडा! भाजपचे 2 खासदार कोसळले; राहुल गांधींनी ढकलल्याचा आरोप

सोशल मीडियाच्या माध्यमातून हमीदा यांना भारतात येण्यास मदत झाली. भारत-पाकिस्तानमधले युट्यूबर ने त्यासाठी पुढाकार घेतला. दोन्ही देशांमधल्या सरकारच्या प्रयत्नांनंतर हमीदा बानो घरी परतू शकल्या, त्याही 23  वर्षानंतर. त्या भारतात आल्यानंतर त्यांच्या घरच्यानी ईद साजरी केली. आपण या काळात खूप त्रास सहन केला. पण पाकिस्ताना आपण दुसऱ्या देशातले आहोत म्हणून कुणी त्रास दिला नाही असं हमीदा सांगता. पाकिस्तानात आपण आरामात फिरत होतो.बाजारात जात होता. कामासाठी एका गावातून दुसऱ्या गावात जात होतो.भारतात परत येवू की नाही याची आपल्याला काहीच अंदाज येत नव्हता. अशा वेळी एका पाकिस्तानी युटूबरच्या मदतीने आपण भारतात येवू शकलो असंही त्या सांगतात. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com