जाहिरात

गेल्या वर्षी घटस्फोट, या वर्षी ब्रेकअप? हार्दिक आणि जास्मिनने एकमेकांना अनफॉलो केले

Hardik Pandya and Jasmin Walia Breakup:हार्दिक पांड्या (Hardik Pandya) किंवा जस्मिन (Jasmin Walia) या दोघांनीही कधीही त्यांच्यातील कथित प्रेमसंबंधांबद्दल अधिकृतरित्या भाष्य केले नव्हते.

गेल्या वर्षी घटस्फोट, या वर्षी ब्रेकअप? हार्दिक आणि जास्मिनने एकमेकांना अनफॉलो केले
मुंबई:

प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि ब्रिटिश-भारतीय गायिका जस्मिन वालिया हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या दोघांचे ब्रेक अप झाल्याची चर्चा असून याच कारणामुळे हे दोघे चर्चेत आलेत  या दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे, ज्यामुळे त्यांच्या प्रेमकहाणीचा अंत झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) किंवा जस्मिन (Jasmin Walia) या दोघांनीही कधीही त्यांच्यातील कथित प्रेमसंबंधांबद्दल अधिकृतरित्या भाष्य केले नव्हते. मात्र हे दोघे एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडाल्याची चर्चा सातत्याने ऐकू येत होती.  मात्र आता या दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याने दोघांचे प्रेमसंबंध संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे.  

( नक्की वाचा: हार्दिक पांड्या पुन्हा परदेशी महिलेच्या प्रेमात? Viral Video नं झालं शिक्कामोर्तब )

हार्दिक पांड्या आणि जस्मिन वालिया यांच्यातील ब्रेकअपच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरू लागल्या आहेत. जस्मिनच्या फॉलोअर्सच्या यादीत हार्दिकचे नाव शोधल्यास ते दिसत नाही आणि हार्दिकच्या प्रोफाइलमध्येही जस्मिनचे नाव दिसत नाही. यामुळे या दोघांच्या चाहत्यांना असे वाटू लागले आहे की या दोघांमध्ये टोकाचे मतभेद झाले असून यामुळे दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला असावा. जाहीररित्या या दोघांनी आपल्या नात्याबद्दल किंवा त्यात आलेल्या दुराव्याबद्दल बोलणे टाळले आहे.  

( नक्की वाचा: घटस्फोटानंतरही प्रेम कायम! नताशाच्या पोस्टवर हार्दिकची प्रतिक्रिया Viral )

गेल्याच वर्षी झाला होता घटस्फोट

हार्दिक पांड्याचे यापूर्वी मॉडेल नताशा स्टँकोविक (Natasa Stankovic) सोबत लग्न झाले होते. गेल्या वर्षी या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांना एक मुलगा असून त्याचे नाव अगस्त्य ठेवण्यात आले आहे.  घटस्फोट झाला असला तरी या दोघांनी मुलाचे सह पालनपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.  या दोघांनी एक संयुक्त निवेदन जारी केले होते आणि आपण घटस्फोट घेत असल्याचे कळवले होते. "चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर, हार्दिक आणि मी परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकत्र असताना आम्ही बरेच प्रयत्न केले आणि सर्वस्व अर्पणही केले.  आम्हाला विश्वास आहे की हा निर्णय आमच्या दोघांच्याही हिताचा आहे. आम्ही कुटुंब म्हणून एकत्र असताना मिळालेला आनंद, एकमेकांबद्दलचा आदर आणि सोबतीचा विचार करता, हा निर्णय घेणे आमच्यासाठी कठीण होते. आम्हाला अगस्त्यचा आशीर्वाद मिळाला आहे, जो आमच्या दोघांच्याही आयुष्याच्या केंद्रस्थानी राहील आणि त्याच्या आनंदासाठी आम्ही त्याला शक्य ते सर्व मिळावे यासाठी आम्ही त्याचे सह-पालनपोषण करू."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com