जाहिरात

Hardik Pandya : हार्दिक पांड्या पुन्हा परदेशी महिलेच्या प्रेमात? Viral Video नं झालं शिक्कामोर्तब

मुंबई इंडियन्सच्या दमदार विजयानंतर त्यांचा कॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा चर्चेत आला आहे.

Hardik Pandya : हार्दिक पांड्या पुन्हा परदेशी महिलेच्या प्रेमात? Viral Video नं झालं शिक्कामोर्तब
मुंबई:

मुंबई इंडियन्सनं आयपीएल 2025 मधील पराभवाची मालिका खंडित केली आहे. त्यांनी सोमवारी (1 एप्रिल) झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा 8 विकेट्सनं पराभव केला. मुंबईच्या या दमदार विजयानंतर त्यांचा कॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा चर्चेत आला आहे. पण, तो क्रिकेटमुळे नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सोशल मीडियावर सुुरु असलेल्या चर्चेनुसार हार्दिक सध्या जस्मिनवालियाला (Jasmin Walia) डेट करतोय.  जस्मिनबी ब्रिटीश गायिका आणि टीव्ही पर्सनॅलिटी आहे.  कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या मॅचनंतर जस्मिनमुंबई इंडियन्सच्या बसमध्ये जाताना दिली. जस्मिनया मॅचच्या दरम्यान मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याला चिअर्स करत होती. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपबाबतच्या चर्चेला पुन्हा एकदा बळ मिळालं आहे. 

टीमच्या बसमध्ये खेळाडू, त्यांचे कुटुंबीय तसंच जवळचे व्यक्तीच जाऊ शकतात. जस्मिन त्या बसमध्ये जाताना दिसल्यानं हार्दिकसोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा खरी असू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

हार्दिक आणि जस्मिन यांच्या रिलेशनशिपची चर्चा होण्याची ही पहिलीच घटना नाही. भारत-पाकिस्तान मॅचच्या दरम्यानही जस्मिन स्टँडवर उपस्थित होती. ती मॅचच्या दरम्यान हार्दिकला फ्लाईंग किस पाठवत होती, असा दावा काही फॅन्सनी केला होता. त्याचबरोबर हार्दिक आणि जस्मिन ग्रीसमध्ये ट्रिपला गेले होते, असा दावाही सोशल मीडियावरील काही युझर्सनी केला होता. रेडिट युझर्सनी दोघांचे वेगवेगळे फोटो शेअर केले होते. हे फोटो कथितपणे एकाच जागेचे होते. 

( नक्की वाचा : Virat Kohli : विराट कोहलीनं 5 सेकंदामध्ये दिलं सर्वात मोठं अपडेट, फॅन्समध्ये जोरदार चर्चा! Video )
 

कोण आहे जस्मिन वालिया?

जस्मिन वालिया ही ब्रिटीश गायिका आणि टेलिव्हजन पर्सनिलिटी आहे. तिनं इंग्रजी, पंजाबी, हिंदीसह अनेक भाषेत परफॉर्म केलं असून म्युझिक इंडस्ट्रीमध्ये स्वत:चं स्थान मिळालं आहे. 2017 साली 'बॉम डिगी' या गाण्यामुळे ती प्रसिद्धीमध्ये आली होती. जस्मिननं हे गाणं ब्रिटीश पाकिस्तानी गायक-गीतकार जॅक नाईटच्या सोबत हे गाणं गायलं होतं. 

'द ओन्ली वे इज एसेक्स' या ब्रिटीश टीव्ही मालिकेतील तिची भूमिका देखील चर्चेत ठरली होती. त्याचबरोबर रिॲलिटी शोमध्ये देखील तिनं काम केलं आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: