जाहिरात

Pune Rain News: मुसळधार पावसामुळे पुणेकरांची तारांबळ, अनेक ठिकाणी पाणी साचलं

Pune Rain Update : पुण्यातील धायरी-सिंहगड रस्त्यावर पाणी साचलं असून वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळत आहे. कोथरूड भागातली रस्त्यावर वाहनांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.

Pune Rain News: मुसळधार पावसामुळे पुणेकरांची तारांबळ, अनेक ठिकाणी पाणी साचलं

Pune Rain News : पुण्यात आज सकाळपासून पावसाचे जोरदार हजेरी लावली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत, तर रहिवासी परिसरातही पाणी शिरलं आहे. काही तासात पडलेल्या पावसामुळे पुणे जलमय झाल्याने नालेसफाईचा मुद्दा देखील समोर आला आहे. 

पुण्यातील धायरी-सिंहगड रस्त्यावर पाणी साचलं असून वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळत आहे. शहरातील भिडे पुलाला देखील पाणी लागलं आहे. कोथरूड भागातली रस्त्यावर वाहनांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. नालेसफाई व्यतिरिक्त मेट्रोच्या कामांमुळे देखील अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं बोललं जात आहे. मात्र सुरुवाच्या पावसातच पुणे महापालिका प्रशासनाच्य कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

(नक्की वाचा-  Rain Alert : राज्यातील या 4 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा; मुंबई-पुण्यात आज पावसाचा काय आहे अंदाज?)

पुण्याला ऑरेंज अलर्ट

पुणे शहराला आणि पुणे घाट परिसरात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अशात  नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. 

खडकवासला धरण क्षेत्रात धो-धो

पुणे शहरासह खडकवासला धरण साखळी क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. खडकवासला धरणातून 2000  क्युसेक पाणी मुळा-मुठा नदीत सोडण्यात येणार आहे. धरण साखरी क्षेत्रात सुरू असणाऱ्या सततच्या पावसामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील चारही धरणात पाणी साठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये एकूण 7.40 टीएमसी म्हणजे 25.39 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. 

(नक्की वाचा- Mahabaleshwar Rain: पावसाचा हाहाकार! महाबळेश्वरमध्ये रस्ता वाहून गेला, वाहतूक ठप्प, पर्यटक अडकले)

गेल्यावर्षी याच दिवशी साठा फक्त 3.62 टीएमसी म्हणजे 12.43 टक्के इतका होता. म्हणजेच यंदा धरणांमध्ये दुपटीपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. चारही धरण परिसरात सुरुवातीच्या टप्प्यात समाधानकारक पाऊस पडत आहे.पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होताना दिसत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com