जाहिरात

Pune News: पुण्यात मुसळधार पाऊस, 'या' महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत, Video होतोय व्हायरल

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगाव आणि परिसरात मान्सूनपूर्व पावसाने बुधवारी दमदार हजेरी लावली.

Pune News: पुण्यात मुसळधार पाऊस, 'या' महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत, Video होतोय व्हायरल
Pune Shirur Rain Video Viral
पुणे:

अविनाश पवार, प्रतिनिधी

Pune Rain Viral Video : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगाव आणि परिसरात मान्सूनपूर्व पावसाने बुधवारी दमदार हजेरी लावली. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. अल्पावधीत झालेल्या जोरदार पावसामुळे महामार्गावरील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले.त्यामुळे वाहनांच्या वेगावर मर्यादा आल्या आणि काही काळ वाहतूक संथ गतीने सुरू होती. विशेषतः कारेगाव, रांजणगाव आणि आसपासच्या भागात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

शेतकऱ्यांसह नागरिकांनाही मोठा फटका

उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत असून शेतकऱ्यांसह नागरिकांनाही त्याचा फटका बसत आहे. कारेगाव परिसरात झालेल्या पावसामुळे महामार्गावर पाणी साचल्याचे चित्र समोर आले असून पावसाळ्यापूर्वी आवश्यक असलेल्या पाणी निचरा व्यवस्थेतील त्रुटीही उघड झाल्या आहेत.

नक्की वाचा >> Kalyan News: सिद्धेश्वर एक्स्प्रेस चोरी प्रकरण, खतरनाक चोरट्याला पकडलं, 1.27 कोटींची सोन्याची बिस्कीटे जप्त

राज्यातील विविध भागांत मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार,महामार्गावरील काही ठिकाणी पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक आउटलेट किंवा ड्रेनेज व्यवस्था अपुरी आहे.परिणामी प्रत्येक पावसात रस्त्यावर पाणी साचते आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.यामुळे अपघाताचा धोका देखील वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा >> Dhule News: वृद्ध महिला घराच्या अंगणात झोपली होती, पहाटे चार जणांनी जे कृत्य केलं..अख्ख गाव हादरलं

पावसाळा तोंडावर असताना अशा धोकादायक ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करून प्रभावी पाणी निचरा व्यवस्था उभारण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का,असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील विविध भागांत मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com