Siddheshwar Express Gold Robbery Case : सोलापूर-कल्याण दरम्यान धावणाऱ्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या दागिने चोरीप्रकरणी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील दहा आरोपींपैकी तीन आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती.आता पोलिसांनी पुणेकर उर्फ शिवया डिकोले याला अटक केली आहे.त्याच्याकडून 1 कोटी 27 लाखांची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. एक व्यवसायिक त्यांच्या मुलीसोबत दागिने विक्री करण्यासाठी सोलापूरला गेले होते. दागिने घेऊन मुंबईला येत असताना सहा महिन्यापूर्वी हा प्रकार घडला होता.
4 आरोपींकडून 1 कोटी 62 लाखांची सोन्याची बिस्कीटे केली जप्त
तपासादरम्यान शिव्या डिकोले यांच्याकडून चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी जवळपास 1 कोटी 27 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 4 आरोपींकडून 1 कोटी 62 लाखांची बिस्किटे हस्तगत केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चोरीनंतर आरोपींनी दागिने वितळवून त्यांचे सोन्याच्या बिस्किटांमध्ये रूपांतर केले होते. पुरावे नष्ट करता येतील आणि मालाची ओळख पटू नये,यासाठी त्यांनी हा प्रकार केला होता.
नक्की वाचा >> Dhule News: वृद्ध महिला घराच्या अंगणात झोपली होती, पहाटे चार जणांनी जे कृत्य केलं..अख्ख गाव हादरलं
आणखी सहा आरोपी फरार
या प्रकरणाचा तपास कल्याण रेल्वे गुन्हे शाखेकडून सुरू असून अटक आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. अद्याप या गुन्ह्यातील आणखी सहा आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांना आणखी जवळपास अडीच ते तीन कोटीची दागिने हस्तगत करायची आहेत.कोट्यवधी रुपयांच्या या चोरीमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून फरार आरोपींच्या अटकेनंतर या गुन्ह्याचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा >> Sangli News: 6 जणांनी सुरू केली 'या' नावाची कंपनी, एकाला 1 कोटी 33 लाखांचा गंडा, सांगलीतील मोठं कांड आलं समोर
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world