नागिंद मोरे, प्रतिनिधी
Dhule Crime News Today : धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथे एक भयंकर घटना घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या भागात राहणाऱ्या सतीश सुभाष पाटील यांच्या घरात समोरील अंगणात त्यांची आई खाटेवर झोपली होती. पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील जवळपास 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले. त्यानंतर चोरटे मोटारसायकलवरून पसार झाले. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सापळा रचून पोलिसांनी चोरट्यांना केली अटक
त्यानंतर शिंदखेडा पोलीस आणि एलसीबी पथकाने संयुक्तपणे धडक कारवाई करत चार चोरट्यांच्या टोळीला अटक केली. वैभव चतुर बोरसे, मुस्तफा जुमा पिंजारी, धिरज बालूसिंग गिरासे आणि भुषण रमेश पाटील अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,शिंदखेडा पोलीस आणि एलसीबी संयुक्तपणे तपास करत असताना चार जणांच्या टोळीला धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या एलसीबी पथकाने मुंबई आग्रा महामार्गावरील सरवड फाटा येथे सापळा रचून अटक केली.
नक्की वाचा >> Sangli News: 6 जणांनी सुरू केली 'या' नावाची कंपनी, एकाला 1 कोटी 33 लाखांचा गंडा, सांगलीतील मोठं कांड आलं समोर
चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले
त्यांच्याकडे असलेला 2 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या तपासादरम्यान चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद,अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने केली.
नक्की वाचा >> Kalyan News : कल्याणच्या 'या' भागात MOMOS विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला, घटनेमागचं कारण पाहून सर्वांना बसला धक्का
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world