![2 दिवस मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; BKC, वांद्रे स्थानक परिसरातून प्रवास करीत असाल तर टाळा! 2 दिवस मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; BKC, वांद्रे स्थानक परिसरातून प्रवास करीत असाल तर टाळा!](https://c.ndtvimg.com/2024-08/ok67r76g_traffic_625x300_29_August_24.jpeg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
बीकेसी, वांद्रे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. बीकेसी येथील जियो वर्ल्ड कॉन्वेंशन सेंटरमध्ये 28 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान ग्लोबल फिनटेक फेस्टचं आयोजन करण्यात आलं आहे. 30 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे, त्याशिवाय जगभरातील मोठमोठी व्यक्तिमत्व या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यामुळे या भागात मोठी गर्दी अपेक्षित आहे. बीकेसीतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जेव्हीएलआर,एससीएलआर आणि पूर्व मुक्त मार्गाचा वापर करण्याचा वाहतूक पोलिसांकडून सल्ला देण्यात आला आहे.
Due to very important event being organised at the Jio World Convention Centre, BKC from 28th to 30th August, heavy vehicular movement is expected in BKC from 9 am to 8 pm.
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) August 28, 2024
सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत या भागात मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते. आजही नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वांद्रे स्थानक पूर्वेकडून बीकेसीला पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्यांना दीड ते दोन तासांचा वेळ लागत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world