मेहबूब जमादार, प्रतिनिधी
Mumbai-Pune Express Way Traffic Jam Video : नाताळ म्हणजेच ख्रिसमसची पार्टी करण्यासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लोकांनी रिसॉर्ट्स, हिल स्टेशन्स, लोणावळा-खंडाला, पु्ण्यासह इतर पर्यटनस्थळी जाण्याची जोरदार तयारी केली आहे. लोकांचे ख्रिसमस पार्टीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून जाणाऱ्या प्रवाशांची मोठी तारंबळ उडाली आहे. कारण या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
अमृतांजण ब्रिजपासून 5 ते 6 किमी पर्यंत..
मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी पुणे मार्गावरील अमृतांजण ब्रिजपासून 5 ते 6 किमी पर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.ख्रिसमस पार्टीसह वीकेंडच्या मुहूर्तावर पर्यटक बाहेर फिरायला जात आहेत.परंतु, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने लोकांची कोंडी झाली आहे.
नक्की वाचा >> पुण्याच्या मित्रासाठी कायपण! अमेरिकेहून 12800 किमीचा प्रवास केला, कारण काय? video पाहून थक्क व्हाल
इथे पाहा वाहतूक कोंडीचा धक्कादायक व्हिडीओ
नाताळचा सण साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक घराबाहेर पडल्याने या महामार्गावर वाहतुकीचा मोठा खोळंबा उडाला आहे. लोणावळा परिसरात जुन्या मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं समोर आलं आहे.
नक्की वाचा >> भारतीय चित्रपटांवर बंदी..पाकिस्तानात Dhurandhar ला का मिळतेय पसंती? अभिनेता म्हणाला, 'आम्ही मुस्लिमांना..'
या वाहतूक कोंडीची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून वाहन चालकांना संयम बाळगण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.