जाहिरात

Pune News: पुण्याच्या मित्रासाठी कायपण! अमेरिकेहून 12800 किमीचा प्रवास केला, कारण काय? video पाहून थक्क व्हाल

तुम्ही तुमच्या मित्राला सरप्राईज देण्यासाठी काय काय करु शकता? प्रेषित गूजर नावाच्या एका व्यक्तीनं त्याच्या पुण्यातील मित्राला सरप्राईज देण्यासाठी जे काही केलं, ते पाहून संपूर्ण सोशल मीडिया थक्क झाला आहे.

Pune News:  पुण्याच्या मित्रासाठी कायपण! अमेरिकेहून 12800 किमीचा प्रवास केला, कारण काय? video पाहून थक्क व्हाल
Pune True Friends Video Viral
पुणे:

Pune True Friends Viral Video : तुम्ही तुमच्या मित्राला सरप्राईज देण्यासाठी काय काय करु शकता? प्रेषित गूजर नावाच्या एका व्यक्तीनं त्याच्या पुण्यातील मित्राला सरप्राईज देण्यासाठी जे काही केलं, ते पाहून संपूर्ण सोशल मीडिया थक्क झाला आहे. प्रेषितने असं काय केलं? असा प्रश्न तमाम नेटकऱ्यांना पडला आहे. आपल्या मित्राला सरप्राईज देण्यासाठी प्रेषितने अमेरिकेहून 12800 किमीची प्रवास करत पुणे गाठलं. इथे प्रेषितचा मित्र वैभव तिखे राहतो.प्रेषितचं म्हणणं आहे की, त्याने फक्त त्याच्या मित्राची रिअॅक्शन पाहण्यासाठी असं केलं. खऱ्या मैत्रीचा हा व्हिडीओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून यावर जबरदस्त कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

चेहरा लपवण्यासाठी त्याने स्कार्फ लावलं होतं, पण नंतर..

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहू शकता की, वैभव त्याच्या काही मित्रांसोबत गप्पा मारत असतो. त्याला प्रेषितच्या येण्याबाबत काहीच कल्पना नसते. तेव्हा अचानक पाठीमागून प्रेषित येतो. त्याने टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातलेली असते. चेहरा लपवण्यासाठी त्याने स्कार्फ लावलेलं असतं. तो सुद्धा वैभव आणि अन्य मित्रांसोबत बसतो. वैभवला वाटलं की, कोणीतरी ओळखीचं असेल.

नक्की वाचा >> रात्रीचे 11 वाजता..एकटी मुलगी अन् मुंबई लोकल, महिला खरंच सुरक्षित आहेत? 'या' व्हिडीओनं दाखवलं मायानगरीचं सत्य

इथे पाहा खऱ्या मैत्रीचा जबरदस्त व्हिडीओ

 तेव्हा अचानक प्रेषित त्याच्या चेहऱ्यावरून स्कार्फ हटवतो. त्यानंतर वैभव त्याला ओळखतो आणि मिठी मारतो. व्हिडीओत दोघांच्या खऱ्या मैत्रीचं जबरदस्त उदाहरण पाहायला मिळतं.या व्हिडीओला 4.6 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत. व्हिडीओ पाहिल्यावर लोकांनी म्हटलंय की, दुरावा असूनही त्यांच्या त एवढं प्रेम आहे. हे खूप खासा आहे. एका अन्य यूजरने म्हटलं, हा व्हिडीओ पाहिल्यावर असं वाटलं की, मला हॉर्ट अटॅक येईल.

नक्की वाचा >> सीक्रेट सँटा नव्हे, हे तर सीक्रेट Swiggy, कोणी केली 1 लाख रुपयांच्या कंडोमची ऑर्डर? काय काय मागवलं? पाहा यादी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com