जाहिरात

मुंबईहून हैदराबादला निघालेलं हेलिकॉप्टर पुण्यात कोसळलं, दुर्घटनेचा VIDEO आला समोर

मुंबईच्या ग्लोबल कंपनीचं हे हेलिकॅाप्टर होतं.  मुंबईतील जुहू येथून विजयवाडा येथे हे हेलिकॅाप्टर निघालं होतं. मात्र पुण्याजवळील गावातील शेतात अचानक हेलिकॉप्टर कोसळलं.

मुंबईहून हैदराबादला निघालेलं हेलिकॉप्टर पुण्यात कोसळलं, दुर्घटनेचा VIDEO आला समोर

रेवती हिंगवे, पुणे

पुण्यामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील मुळशी तालुक्यातील पौडजवळ हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे.सतत सुरु असलेल्या पावसामुळे, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळलं असावं असा अंदाज आहे. अपघाताचे तांत्रिक कारण अद्याप समोर नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमधून पायलटसह चार जण प्रवास करत होते. दुर्घटननेनंतर सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. 

मुंबईच्या ग्लोबल कंपनीचं हे हेलिकॅाप्टर होतं.  मुंबईतील जुहू येथून विजयवाडा येथे हे हेलिकॅाप्टर निघालं होतं. मात्र पुण्याजवळील गावातील शेतात अचानक हेलिकॉप्टर कोसळलं. ग्लोबल हेक्ट्रा या कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं. 

हेलिकॉप्टरमधील प्रवाशांची माहिती

पायलट आनंद हे जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तरदिर भाटिया, अमरदीप सिंग, एसपी राम यांची प्रकृती स्थिर आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
रविवारी उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक, कोणत्या लोकल झाल्या रद्द?
मुंबईहून हैदराबादला निघालेलं हेलिकॉप्टर पुण्यात कोसळलं, दुर्घटनेचा VIDEO आला समोर
how-to-find-lost-luggage-in-trains-using-indian-railways-rail-madad-mobile-app
Next Article
रेल्वेमध्ये सामान हरवलं तर मिळेल परत, 'या' पद्धतीनं करा काही मिनिटांमध्ये उपाय