Amravati News: 45 अंशात भाजपच्या 'या' मंत्र्याचा शाही दौरा, हेलिपॅड सज्ज, PM मोदींच्या आवाहनाला केराची टोपली

विदर्भात सध्या सूर्य आग ओकत असून पारा 45 अंशांच्या पार गेला आहे.अशा भीषण उष्णतेत सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असताना, अमरावतीच्या दर्यापुरात मात्र प्रशासकीय यंत्रणा चक्क एका मंत्र्याच्या 'शाही'दौऱ्यासाठी राबत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Chandrashekhar Bawankule Latest News

शुभम बायस्कर, प्रतिनिधी 

Chandrashekhar Bawankule Latest News : विदर्भात सध्या सूर्य आग ओकत असून पारा 45 अंशांच्या पार गेला आहे.अशा भीषण उष्णतेत सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असताना, अमरावतीच्या दर्यापुरात मात्र प्रशासकीय यंत्रणा चक्क एका मंत्र्याच्या 'शाही'दौऱ्यासाठी राबत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीचे आवाहन करूनही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या (16 मे) हेलिकॉप्टरने दर्यापूर गाठणार आहेत.यावरून काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी कडाडून टीका केली आहे. 

विदर्भातील उष्णतेच्या लाटेमुळे दुपारी घराबाहेर पडणेही अशक्य झाले आहे.मात्र,बावनकुळेंच्या हेलिकॉप्टरसाठी दर्यापुरात हेलिपॅड तयार करण्याचे काम रणरणत्या उन्हात युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती आहे.गरिबांना आणि कर्मचाऱ्यांना या उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असताना,मंत्र्यांच्या या हेलिकॉप्टर वारीमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

Advertisement

नक्की वाचा >> मौनी रॉयने 19 वर्षाची असतानाच घेतला होता 'हा' मोठा निर्णय, वेडीपिसीच झाली होती, जुना व्हिडीओ व्हायरल

खासदार बळवंत वानखेडे यांचा हल्लाबोल

याच मुद्यावरून खासदार बळवंत वानखडे यांनी बावनकुळेंवर निशाणा साधला.वानखेडे म्हणाले की,"पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशी दौरे आणि ताफ्यातील गाड्या कमी करून पेट्रोल-डिझेल वाचवण्याचे सल्ले देतात.पण त्यांचेच मंत्री विदर्भाच्या या भीषण उन्हात हेलिकॉप्टरने फिरून सरकारी पैशांची आणि इंधनाची उधळपट्टी करत आहेत."

'नॉन-इम्पॉर्टंट'बैठकीसाठी हेलिकॉप्टरचा अट्टहास?

बावनकुळे उद्या दर्यापुरात जी बैठक घेणार आहेत,ती फारशी महत्त्वाची नसल्याचा दावा वानखडे यांनी केला आहे."उद्याची बैठक इतकीही निकडीची नाही की त्यासाठी हेलिकॉप्टरने यावे लागेल.मुख्यमंत्री स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी बुलेटने फिरतात आणि मंत्री हेलिकॉप्टरने..जर पंतप्रधानांच्या धोरणांच्या विरोधात जाऊन बावनकुळेंना वागायचे असेल,तर आमची हरकत नाही,पण जनतेचा पैसा असा उधळणे चुकीचे आहे,"असेही वानखेडे यांनी ठणकावून सांगितले.

नक्की वाचा >> Pune News : लोणावळ्यात पुणे पोलिसांची धडक कारवाई, 'या' ठिकाणी सुरु होता भयंकर प्रकार, स्थानिकांसह पर्यटक भयभीत

"विदर्भात 45 अंश तापमान असताना कर्मचारी उन्हात हेलिपॅड बनवत आहेत.मोदींनी बचतीचं आवाहन केलंय,पण बावनकुळे हेलिकॉप्टरशिवाय खाली उतरत नाहीत.या बैठकीसाठी एवढा खर्च करणं जनतेची क्रूर थट्टा आहे.", अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांनी दिली आहे.