जाहिरात

ED Raid Video: अबब, पैशांचा डोंगर! ED च्या कारवाईत घरात पैशांचा ढिग, पैसे मोजता मोजता अधिकारी जेरीस

याबाबत अधिक तपास ही केला जात आहे. या कारवाईनंतर अवैध पद्धतीने पैसे कमावणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

ED Raid Video: अबब, पैशांचा डोंगर! ED च्या कारवाईत घरात पैशांचा ढिग, पैसे मोजता मोजता अधिकारी जेरीस

अवैध मार्गाने कमवलेल्या पैशांवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ईडीच्या अधिकाऱ्यांना संबंधीताच्या घरी पैशांचा डोंगरच सापडला आहे.हे पैसे पाहून ईडीचे अधिकारी ही चक्रावले आहेत. तिथे असलेले पैसे मोजता मोजता तेच जेरीस आले होते. झारखंडमधील धनबाद येथे ही कारवाई करण्यात आली. बेकायदा कोळसा खाणकाम, तस्करीत, खंडणी आणि लेव्ही वसुलीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ED ने ही मोठी कारवाई केली . 

ईडीच्या पथकाने एकाच वेळी 31 ठिकाणी छापे टाकले होते. त्यात बेकायदेशीर व्यवहारांचा मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान ईडीने मुख्य आरोपी एलबी सिंह आणि त्यांच्याशी संबंधित नेटवर्कचे सुमारे 160 कोटी रुपयांचे म्युच्युअल फंड गुंतवणूक खाते गोठवले (Freeze) आहे. याशिवाय 1.02 कोटी रुपयांची अघोषित रोकड जप्त करण्यात आली आहे. छाप्यादरम्यान 200 हून अधिक स्थावर व जंगम मालमत्तांची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत.

नक्की वाचा - Delhi Protest: विद्यार्थी आंदोलन! दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून कोणते 5 धडे घ्यावेत?

ईडीचे अधिकाऱ्यांनी ज्या वेळी छापा टाकला त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसला. आरोपी एलबी सिंह याच्या घरी पोलिसांना जणून पैशाचा डोंगरच सापडला होता. नोटांच्या बंडलांचा थर लावण्यात आला होता. हे सर्व पैसे मोजण्याचे आवाहन ईडीच्या अधिकाऱ्यां समोर होते. ज्या वेळी हे पैसे मोजले त्यावेळी ते एक कोटी पेक्षा जास्त होते. तेवढी मोठी कॅश घरी ठेवण्यात आली होती. या पैशांचा कोणताही हिशोब कुठेच ठेवण्यात आला नव्हता. ही सर्व कॅश ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे.  

नक्की वाचा - Jalgaon News: भाजपमध्ये एका ऑडिओ क्लिपने खळबळ! जेष्ट नेता, महिला नेत्यांबाबत खालच्या पातळीवरचं बोलणं

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट (PMLA) अंतर्गत ही कारवाई 28 जुलै रोजी करण्यात आली. धनबाद व लगतच्या परिसरातील कोळसा व्यावसायिक अनिल गोयल, एलबी सिंह, हरेंद्र चौहान आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणांवर ही छापेमारी झाली. या कारवाईत गणेश यादव, पप्पू मंडल, रोहित यादव आणि माधो सिंह यांच्याशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईत मोठ्या प्रमाणात रक्कम आणि इतर गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक तपास ही केला जात आहे. या कारवाईनंतर अवैध पद्धतीने पैसे कमावणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com