Mumbai High Tide : 6 डिसेंबरला चैत्यभूमीवरील समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नका; पालिकेकडून 4 दिवसांचा अलर्ट 

४ ते ७ डिसेंबर या चार दिवसात कोणीही समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नये असं पालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

BMC High Tide : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत मोठ्या भरतीचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. ४ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान सलग ४ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. ही भरती दरम्यान समुद्रामध्ये साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. 

यामध्ये भरतीचा दिनांक व वेळ यासह भरती दरम्यान समुद्रात उसळणा-या लाटांची उंचीदेखील नमूद करण्यात आली आहे. ६ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १२ वाजून ३९ मिनिटांनी ५.०३ उंचीच्या लाटा उसळणार आहेत. मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिनाऱ्याजवळ जाऊ नये, असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.  तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे नागरिकांना करण्यात येत आहे. 

चैत्यभूमीच्या सुमद्रकिनारी जाऊ नका...



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे येणाऱ्या अनुयायांनीदेखील समुद्रकिनारी योग्य खबरदारी बाळगावी. 

Advertisement

नक्की वाचा - दक्षिण मुंबई ते ठाणे प्रवास फक्त 25 मिनिटांत; MMRDA चा नवा प्रकल्प ईस्टर्न फ्रीवेवरील वाहतूक कोंडी फोडणार

४ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यानच्या भरतीचे वेळापत्रक... 

१. गुरुवार, ४ डिसेंबर - रात्री – ११:५२ वा.- लाटांची उंची - ४.९६ मीटर

२. शुक्रवार, ५ डिसेंबर -  सकाळी – ११:३० वा.- लाटांची उंची - ४.१४ मीटर

३. शनिवार, ६ डिसेंबर - मध्यरात्री – १२:३९ वा.-लाटांची उंची - ५.०३ मीटर

४. शनिवार, ६ डिसेंबर - दुपारी – १२.२० वा.- लाटांची उंची - ४.१७ मीटर

५. रविवार, ७ डिसेंबर - मध्यरात्री – ०१.२७ वा. लाटांची उंची - ५.०१ मीटर

६. रविवार, ७ डिसेंबर - दुपारी – ०१.१० वा. लाटांची उंची  - ४.१५ मीटर

Topics mentioned in this article