MMRDA ने मुंबई आणि ठाण्यातील लाखो प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. एलेव्हेटेड ईस्टर्न फ्रीवे विस्ताराच्या 13.9 किलोमीटर लांब आणि पूर्णपणे उन्नत असलेल्या सहा लेनच्या कॉरिडोरच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.
सोमवारी 'X' पोस्टद्वारे MMRDA ने या प्रकल्पाबद्दल माहिती दिली. हा हायस्पीड कॉरिडोर पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबई आणि ठाणे दरम्यानचा प्रवास कमी होऊन केवळ 25 ते 30 मिनिटांपर्यंत खाली येणार आहे. सध्या ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे हा मुंबईतील सर्वात व्यस्त मार्ग आहे. दररोज लाखो प्रवासी येथून प्रवास करतात. या हायवेवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
समृद्धी महामार्गापर्यंत कनेक्टिव्हिटी
या प्रकल्पाची रचना हायस्पीड प्रवासासाठी करण्यात आली आहे. ठाण्यात हा उन्नत मार्ग जुन्या मुलुंड टोल नाक्याजवळ असलेल्या आनंद नगर-साकेत उन्नत मार्गाशी एकत्रितपणे जोडला जाईल. हाय-स्पीड कॉरिडोर पुढे समृद्धी महामार्गालाही कनेक्टिव्हिटी देईल.
यामुळे लाखो नागरिकांसाठी जलद, सुरक्षित आणि अधिक हरित प्रवास याद्वारे मिळणार आहे. तसेच, यामुळे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (MMR) आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
(नक्की वाचा- Pune School News: पुण्यातील या शाळांच्या वेळेत बदल! काय आहे कारण आणि नवीन वेळ)
Soon: South Mumbai–Thane in just 25 minutes
— MMRDA (@MMRDAOfficial) December 1, 2025
MMRDA has commenced construction of the Elevated Eastern Freeway Extension, a 13.9 km, fully elevated 6-lane high-speed corridor that will dramatically reduce travel time between South Mumbai and Thane to 25–30 minutes, while easing… pic.twitter.com/9vL689iC7U
पर्यावरणाची काळजी
विक्रोळी-घाटकोपर पट्ट्यातील 127 पिंक ट्रम्पेट झाडे वाचवण्यासाठी पर्यावरण तज्ञ आणि कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानुसार डिझाइनमध्ये बदल करण्यात आले आहेत. या भागातील हरित आवरण आणखी मजबूत करण्यासाठी 4175 नवीन झाडांचे भरपाई म्हणून वृक्षारोपण केले जाणार आहे.
प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये
या प्रकल्पामध्ये 2.5 मीटर व्यासाचे मोनोपाइल्स, 40 मीटर स्पॅन असलेले मजबूत पियर्स आणि 25 मीटरचा सिंगल-सेगमेंट सुपरस्ट्रक्चर यांचा समावेश आहे. या कॉरिडोरमध्ये सिंगल-पाइल, सिंगल-पियर सिस्टीमचा वापर केला जाईल, जी MMR मध्ये प्रथमच वापरली जात आहे.
याशिवाय, मुलुंड चेक नाका, ऐरोली जंक्शन आणि विक्रोळी जंक्शनजवळ अप आणि डाउन रॅम्प्स असतील. तसेच, नवघर उड्डाणपुलाजवळ एक सहा-लेनचा उन्नत टोल प्लाझा तयार केला जाईल.
(नक्की वाचा- 19 मिनिटांच्या व्हायरल व्हिडीओचा विषय काय? VIDEO मिळवण्यासाठी प्रयत्न कराल तर जेलमध्ये जाल)
सध्याचे काम
MMRDA नुसार, प्राथमिक सर्वेक्षण आणि चाचणी पाइल इन्स्टॉलेशन्स पूर्ण झाले आहेत, भू-तांत्रिक तपासणी जवळजवळ संपली आहे आणि युटिलिटी ओळख देखील पूर्ण झाली आहे. सध्या पाइलिंग आणि पियर बांधण्याचे काम सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world