जाहिरात

HMPV Mumbai : चीनमध्ये धुमाकूळ, भारतात एण्ट्री, मुंबईत HMPV ची स्थिती काय?

मानवी मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. मानवी मेटान्यूमोव्हायरस (HMPV) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे.

HMPV Mumbai : चीनमध्ये धुमाकूळ, भारतात एण्ट्री, मुंबईत HMPV ची स्थिती काय?
मुंबई:

चीनमध्ये सुरू असलेल्या मानवी ‘मेटान्यूमोव्हायरस' म्हणजेच HMPV या विषाणूच्या साथ पसरली आहे. आरोग्य सेवा संचालनालय पुणे यांनी 3 जानेवारीला याबाबत एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत, याबाबतची माहिती मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. मुंबई शहर व उपनगरात असा Human Metapneumo Virus (HMPV) बाधित कोणताही रुग्ण आढळून आलेला नाही. अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. नागरिकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असेही आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मानवी मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. मानवी मेटान्यूमोव्हायरस (HMPV) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. ज्यामुळे  श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास म्हणजे सर्दीसारख्या गोष्टींना कारणीभूत ठरतो. हा एक हंगामी रोग आहे. जो सामान्यतः आर. एस. व्ही. आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडस् मध्ये वर्ष 2001 मध्ये आढळला होता. 

ट्रेंडिंग बातमी - HMPV Update : पुन्हा मास्क, पुन्हा सॅनिटायझर? भारतात HMPV चे 2 रुग्ण, आरोग्य विभागाने जारी केली नियमावली

याअनुषंगाने आरोग्य सेवा महासंचालनालय  आणि संचालक राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र  यांनी 3 जानेवारीला याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात चीनमध्ये आढळून आलेला विषाणू Human Metapneumo Virus (HMPV) अहवालाबाबत चिंतेचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भीतीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही.असं स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - HMPV : चीनमध्ये HMPV चा कहर, भारतात पहिला रुग्ण आढळल्याने चिंता वाढली; 8 महिन्यांच्या बाळाला लागण!

सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष 2023 च्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. खबरदरीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनांच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये यासंदर्भातील सूचनाचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान या आजाराचा एकही रूग्ण मुंबईत आढळलेला नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com