जाहिरात
5 hours ago

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी देशमुख कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हत्या करणाऱ्यांना सोडणार नसल्याचं आश्वासन दिलं. दुसरीकडे देशभरात पसरू पाहणाऱ्या HMPV मुळे राज्याचं आरोग्य विभाग अलर्टवर आलं आहे. नागपुरात दोन रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्याच्या हवामानाबद्दल सांगायचं झालं तर पुढील दोन दिवस मुंबईसह राज्यभरात थंडी कायम राहणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 


 

तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, 4 भाविकांचा मृत्यू

तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, 4 भाविकांचा मृत्यू, अनेकजण जखमी.  वैकुंठद्वार सर्वदर्शनम टोकन वाटपादरम्यान तिरुपतीच्या विष्णु निवासममध्ये चेंगराचेंगरी.

प्रसिद्ध चित्रपट निर्माते, कवी आणि लेखक प्रितिश नंदी यांचे निधन

प्रसिद्ध चित्रपट निर्माते, कवी आणि लेखक प्रितिश नंदी यांचे निधन. प्रितिश यांनी वयाच्या 73 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप.

परळी तालुक्यात वर्षभरात सापडले 109 मृतदेह

परळी तालुक्यातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरात परळी तालुक्यातील तीन पोलीस स्टेशन हद्दीत एकूण 109 मृतदेह सापडले आहेत. मागील वर्षभरात परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 66 मृतदेह आढळून आले, त्यापैकी 64 मृतदेहाची ओळख पटली तर 2 मृतदेहाची ओळख पटली नाही. परळी शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एकूण 17 मृतदेह आढळले आहे. सर्वांची ओळख पटली आहे. परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत 26 मृतदेह आढळले आहे, त्यातील 21 मृतदेहाची ओळख पटवण्यात आली असून, 4 मृतदेहाची ओळख पटली नाही. तीनही पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील वर्षभरात 109 मृतदेह शहर आणि परिसरात आढळून आले आहेत. म्हणजेच 3 दिवसांनी 1 अशी मृतदेह सापडल्याची सरासरी आहे. या सगळ्याचा तपास जेमतेम होऊन प्रकरण फाईल बंद झाल्याचं सांगण्यात येत आहे.

सोलापूरच्या फटाटेवाडी येथे उसाच्या शेताला आग, 15 ते 20 एकर ऊस जळून खाक

सोलापूरच्या फटाटेवाडी येथे उसाला लागली भीषण आग 

भीषण आगीमुळे पंधरा ते वीस एकर ऊस जळून खाक झाल्याची शक्यता 

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर 

गावकऱ्यांच्या आग्निशामक दलाच्या मदतीने आग आणली आटोक्यात 

या आगीमुळे शेतकऱ्यांच्या उसाचे मोठे नुकसान 

तात्काळ प्रशासनाने दखल घेऊन पंचनामे करून मदत द्यावी शेतकऱ्यांची मागणी

शहरी नक्षलवाद प्रकरण, रोना विल्सन आणि सुधीर ढवळे यांना जामीन मंजूर

शहरी नक्षलवाद प्रकरणी आणखी दोघांना जामीन मंजूर

रोना विल्सन आणि सुधीर ढवळे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

प्रत्येकी 1 लाखाच्या जामीनावर सुटका करण्याचे आदेश

दोन्ही आरोपी गेल्या 6 वर्षांपासून तुरूंगात असून, प्रलंबित खटला लवकर निकाली लागण्याची चिन्ह नाहीत, त्यामुळे आरोपी जामीनास पात्र - हायकोर्ट

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाच्या परवानगीविना मुंबईबाहेर जाण्यास मनाई

मुंबईतील निवासाचा पत्ता आणि मोबाईलक्रमांक तपासअधिकाऱ्यांना देणे बंधनकारक, साक्षी पुरव्यांशी छेडछाड करण्यास मनाई

आरोपींना पासपोर्ट तपासयंत्रणेकडे जमा करत दर सोमवारी एनआयए मुख्यालयात हजेरी लावणं अनिवार्य

घात की अपघात? बीडमध्ये तरुणांचा मृतदेह आढळल्याने खळबळ

बीडच्या अंबाजोगाई परिसरामध्ये 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील मुकुंदराज रोडवरील गवळी यांच्या शेताच्या परिसरामध्ये हा मृतदेह आढळून आला असून मयत तरुणाच्या चेहऱ्यावर जखमा असल्याचं समोर आले आहे. शौकत अली मेहराज अली सय्यद (वय 25) असं मयत तरुणाचे नाव आहे. तर घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, पंचनामा केला. त्यानंतर सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान हा घात आहे की अपघात? याचा तपास आता अंबाजोगाई पोलीस करत आहेत.

बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मालेगावात जन्म प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण, गृह विभागाने SIT गठित

बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मालेगावात जन्म प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण, गृह विभागाने SIT गठित केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेशानंतर DIG नाशिक यांच्या अध्यक्षतेत SIT स्थापन. विभागीय सहआयुक्त, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हे असतील सदस्य.  चौकशी करून अहवाल देण्यासह शिफारसी करण्यास सुद्धा सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार पार्थ पवारांसह दिल्लीत दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. अजित पवार यांच्या सोबत पार्थ पवार ही दिल्लीत आले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बैठक असल्याची माहिती मिळतेय.

धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाणे परीसरात अचानक मोठा स्फोट

धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाणे परीसरात अचानक मोठा स्फोट 

पोलीस स्टेशन शेजारील घरांचे पत्रे उडाले तर इतरही मोठे नुकसान 

स्फोट एवढा मोठा होता की पोलीस स्टेशनच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि सर्वत्र धुळ पसरली

पोलीस स्टेशनच्या समोर खुल्या जागेत झाला स्फोट

बॉम्बशोधक पथक व श्वान पथक पाचारण करून घटनास्थळाची पाहणी

पूर्वी कधी तरी जिलेटिन नष्ट करायच्या उद्देशाने पुरून ठेवल्याचा प्राथमिक अंदाज

आवादा कंपनी खंडणी प्रकरण, आरोपी विष्णू चाटेची सीआयडी चौकशी

आवादा कंपनीकडून 2 कोटी रुपये खंडणी मागितल्याच्या प्रकरणात आरोपी विष्णू चाटेची सीआयडीने सलग चौकशी केली. विष्णू चाटे हा सध्या पोलीस कोठडीत असून त्याला केज येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.  या ठिकाणी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी त्याची कसून चौकशी केली. तसेच  त्याच्या घराची देखील झडती घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

दोन जहाल महिला माओवाद्यांचं गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण

दोन जहाल महिला माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण केले. दोघींवर शासनाने एकूण 10 लाख रूपयाचे बक्षिस जाहीर केले होते. शामला झुरु पुडो ऊर्फ लीला आणि  काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी असे आत्मसमर्पण केलेल्या महिलांची नावे आहेत. 

पुण्यातील शाळेत चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केल्याचा प्रकार उघडकीस

पुण्यातील शाळेत चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील पाषाण भागातील नामांकित शाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे. शाळेतील शिपायाने हे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचे समोर आले आहे.  या प्रकरणी शिपाई तुषार सरोदे याला पोलिसांनी अटक केली आहे. 

मुलानेच केली वडिलांची हत्या, वाशिममधील खळबळजनक घटना

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लोणी बु. गावात हृदयद्रावक घटना घडली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या 67 वर्षीय वडिलांची हत्या केली आहे. निवृत्ती नरवाडे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर मुलगा मनोरुग्ण असल्याचं सांगितलं जातं आहे. वडील मयत झाल्यानंतर 25 वर्षीय मुलगा गणेश नरवाडे मृतदेहाजवळच बसून होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, रिसोड पोलीस पुढील तपास करत आहेत.

नितेश राणे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर? केंद्रीय गृहमंत्रालयाकडून गंभीर दखल

दहशतवाद्यांकडून हिंदू नेत्यांना टार्गेट करण्याचा धोका वर्तवला जात आहे. हिंदू नेत्यांची हिट लिस्ट तयार केल्याची सोशल मीडियावर माहिती. व्हायरल यादीमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या नावाचाही समावेश आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्याही नावाचा यादीत उल्लेख आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याची माहिती आहे.

Live Update : 45 वर्षांनंतर दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता बदलणार

तब्बल 45 वर्षांनंतर काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता आता बदलणार आहे. दिल्लीतील 24 अकबर रोड येथील काँग्रेस मुख्यालय 9 ए कोटला रोड येथे शिफ्ट होणार आहे. येत्या 15 जानेवारीपासून काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता बदलणार आहे. 

Live Update : सोलापूर जिल्ह्यातील 23 साखर कारखान्यांना नोटीसा

 सोलापूर जिल्ह्यातील 23 साखर कारखान्यांना नोटीसा 

- जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन दोन महिने झाले तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खातात एफआरपी रक्कम जमा नाही

- शेतकरी संघटनेसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांची साखर कारखान्यावर केली कारवाईची मागणी 

- सोलापूर जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या साखर कारखान्यांचा समावेश 

- जिल्ह्यातील 23 साखर कारखान्यांना सोलापूरच्या प्रादेशिक सहसंचालकांनी नोटीस बजावली

- आठ दिवसात ऊस उत्पादकांचे पैसे द्या, अन्यथा आरआरसीची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असा इशारा प्रादेशिक सहसंचालकानी दिला आहे.

Live Update : मला अजित पवार गटाकडून कोणीही संपर्क साधला नाही, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे स्पष्टीकरण

मला अजित पवार गटाकडून कोणीही संपर्क साधला नाही, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे स्पष्टीकरण

Live Update : तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यातील प्राचीन शिळांना तडे

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे जतन व संवर्धनाचे 65 कोटी रुपयांचे काम मंदीर संस्थानच्या स्वनिधीतुन सुरु आहे. जीर्णोद्धाराच्या विविध कामांची जिल्हाधिकारी व पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्याच्या कामाला पुरातत्व विभागाने सुरुवात केली आहे. देवीच्या मंदिरातील मंडपाचे बरेचसे दगड कललेले असल्याने ते पुर्ण काढुन पुन्हा नव्याने उभे केले जाणार आहेत. तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्याचे स्ट्रॅक्चरल इंजीनिअरिंग व रडार तंत्रज्ञानाचा वापर करुन दगड आगामी 200 वर्ष मंदिराच्या कळसाचा भार सहन करू शकतील का याचा अहवाल पुरातत्व विभाग 8 दिवसात सादर करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

Live Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणी संभाजी वायबसे व सुरेखा वायबसे या दोघांची सीआयडीकडून पुन्हा चौकशी..

संतोष देशमुख हत्याप्रकरणी संभाजी वायबसे व सुरेखा वायबसे या दोघांची सीआयडीकडून पुन्हा चौकशी..

यापूर्वीच संभाजी वायबसे आणि सुरेखा वायभसे यांची सीआयडीने चौकशी केली होती. मात्र त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले होते. देशमुख हत्या प्रकरणातील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप सापडलेला नाही. 

Live Update : बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयाला राष्ट्रवादीने भेट दिलं कुलूप

बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाईकांशी उद्धटपणे बोलत रुग्णालय बंद करेन, अशी धमकी दिल्यानं राष्ट्रवादी शरद पवार गटाने आक्रमक भूमिका घेत रुग्णालय अधीक्षकांना कुलूप, चावी भेट देत हे रुग्णालय बंद करून दाखवा, असा इशारा दिला.

Live Update : HMPV च्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा रुग्णालय सज्ज..

महाराष्ट्रात HMPV च्या रुग्णसंख्येत वाढ होत असून या संसर्गाचा धोका लक्षात घेता नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय आता सतर्क झाले आहे. रुग्णालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात येत असून 10 बेडची व्यवस्था करण्यासोबतच ऑक्सिजनची कमतरता पडणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली जाते आहे. दरम्यान या आजाराला घाबरून जाऊ नका. मात्र सर्दी खोकला किंवा इतर कोणताही त्रास जाणवल्यास तो अंगावर काढू नका. तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या, उपचार करा असे आवाहन नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाचे शल्यचिकित्सक चारुदत्त शिंदे यांनी केले आहे. 

Live Update : केडीएमसीच्या कचऱ्याच्या गाडीच्या धडकेत महिलेसह तिच्या मुलाचा मृत्यू

कल्याण पश्चिम लाल चौकी परिसरातील दुर्दैवी घटना

केडीएमसीच्या कचऱ्याच्या गाडीच्या धडकेत महिलेसह तिच्या मुलाचा मृत्यू 

महिला मुलासह रस्ता ओलांडत असताना झाला अपघात 

नीशा सोमेसकर आईचे नाव, अंश सोमेसकर मुलाचं नाव

पोलीस घटनास्थळी दाखल, ट्रक चालकाला घेतलं ताब्यात

Live Update : महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण, मराठी भाषेला अभिजात दर्जा; मंत्री उदय सामंत यांच्याकडे शासन आदेश सुपूर्द

महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण, मराठी भाषेला अभिजात दर्जा  मंत्री उदय सामंत यांच्याकडे शासन आदेश सुपूर्द

Live Update : पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मविआच्या 12 पराभूत उमेदवारांची उच्च न्यायालयात धाव

पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मविआच्या 12 पराभूत उमेदवारांची उच्च न्यायालयात धाव; महायुतीच्या जिंकलेल्या उमेदवारांची निवडणूक रद्द करण्याची मागणी 

Live Update : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर

पक्षाच्या पदाधिका-यांची दिल्लीत घेणार बैठक

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती

सोबतच पक्षाच्या संघटनात्मक गोष्टींवर देखील होणार चर्चा

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची देखील भेट घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती

दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 11 उमेदवारांची पहिली यादी यापूर्वीच केली आहे जाहीर

Live Update : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला

मंत्री आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी 

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला 

कालच्या मनसेच्या बैठकीत देखील आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपसोबत जाण्याचा सूर दिसून आला

यावर देखील काही चर्चा होते का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे

Live Update : महाराष्ट्रातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अयोध्याचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराजांची उपस्थिती

महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथे तयार झाले असून 17 मार्च रोजी मंदिराचे लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. मंदिराच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी 17 मार्च रोजी प्रभू श्रीरामचंद्र आयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज उपस्थित राहणार आहेत.  मंदिराचे निर्माते तथा शिवकांति प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू भाऊ चौधरी, कैलास महाराज निचिते, गोरक्षनाथ पैठणकर शास्त्री गुरुजी यांनी आयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांची भेट घेत मंदिर लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण दिले.

Live Update : महायुतीत भाजप महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा तयारीत?

महायुतीत भाजप महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा तयारीत? 

छत्रपती संभाजीनगरच्या भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांचं मोठं वक्तव्य 

महायुती संभाजीनगरची महानगरपालिका भाजप स्वबळावर लढण्याची करतेय तयारी 

महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच महायुती नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता

Live Update : मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाही - सुरेश धस

मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाही. मी आकाच्या आकांविषयी बोलत होतो  - सुरेश धस

मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाही, अजित पवारांच्या भेटीनंतर सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया

 

Live Update : बाबा सिद्दिकी यांची हत्या प्रकरणात मोठी अपडेट

बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी तीन आरोपींनी बाबा सिद्दिकी आणि झिशांत सिद्दिकी यांच्यावर तीन ते चार वेळा बारीक नजर ठेवली होती 

प्रत्येक वेळी रेकी करताना त्यांच्याजवळ एक बॅग आणि पेपर स्प्रे तयार होता. जेणेकरून पोलिसांनी पकडले तर त्यांना गुंगारा देता येईल 

ज्या वेळेला संधी मिळेल त्या वेळी गोळी चालवण्याची त्यांची तयारी होती 

तपासात हे देखील सिद्ध झालं आहे की, 13 हजार रुपये देऊन पेपर स्प्रे आरोपींनी खरेदी केले होते 

बाबा सिद्दिकी यांच्यावर फायरिंग केल्यानंतर पोलिसांनी पकडू नये यासाठी पेपर स्प्रे चा उपयोग केला गेला

Live Update : सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या खासदारांशी संपर्क केल्याने सुप्रिया सुळे नाराज

सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या खासदारांशी संपर्क केल्याने सुप्रिया सुळे नाराज 

सुळे यांनी प्रफुल पटेल यांना फोन केल्याची चर्चा  

सुनील तटकरे हे शरद पवार पक्षाच्या खासदारांशी संपर्क करत असल्याची चर्चा 

यावरूनच सुळे यांनी नाराजी व्यक्त करत पटेल यांना फोन केल्याचं समजते 

आमच्या पार्टीचे खासदार कोठे ही जाणार नाहीत - शरद पवार यांची NDTV मराठीला माहिती

Live Update : मनोज जरांगेंवर दोन दिवसांत 12 गुन्हे दाखल

मनोज जरांगेंवर दोन दिवसांत 12 गुन्हे दाखल 

एकट्या बीड जिल्ह्यात जरांगेंवर 10 गुन्हे दाखल 

हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही जरांगेंवर  प्रत्येकी एक गुन्हा दाखल

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणी येथे आयोजित निषेध मोर्चात मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वंजारी समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत करण्यात आले गुन्हे दाखल

Live Update : सुरेश धस देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांच्या भेटीला

सुरेश धस देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांच्या भेटीला 

काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर आज पुन्हा धस हे अजित पवार यांच्या भेटीस

Live Update : मुंबईत HMPV चा शिरकाव, पहिला रुग्ण आढळला

मुंबईत आढळला HMPV चा पहिला रुग्ण 

पवईतील हिरानंदानी रुग्णालयातील सहा महिन्याच्या बाळाला HMPVचा संसर्ग 

Live Update : मुलीशी गैरवर्तन, उमरगा पोलीस ठाण्यात दोन दिवसांनंतर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

मरगा तालुक्यातील एका गावामध्ये शेतीच्या वादातून आई व पंधरा वर्षीय मुलीला जबर मारहाण करण्यात आली. यात पंधरा वर्षीय मुलीशी गैरवर्तन करत मारहाण केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर कैफियत मांडल्यानंतर दोन दिवसानंतर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, अधिक तपास पोलीस करत आहेत.

Live Update : वाल्मिक कराडचा घेणार व्हॉइस सॅम्पल : सूत्रांची माहिती

वाल्मिक कराडचा घेणार व्हॉइस सॅम्पल : सूत्रांची माहिती

मस्साजोगमधील पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणी मागितल्याप्रकरणात कराड अटकेत

खंडणी गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराडचे आज व्हॉइस सॅम्पल घेतले जाणार 

दुसरा आरोपी विष्णू चाटे याच्या घराची झडतीही घेतली जाणार

Live Update : प्रवीण माने यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आल आहे. शरद पवार यांनी तिकीट नाकारल्यानंतर प्रवीण माने यांनी पक्षविरोधी भूमिका घेत इंदापूरमधून अपक्ष निवडणूक लढवली होती. यात त्यांचा पराभव झाला तर मराठा मतांचे विभाजन झाल्यामुळे अजित पवारांचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या विजयाचा मार्ग सुखर झाला.

Live Update : शहापूर ज्वेलर्स हत्याकांडातील दोन आरोपींना अटक..!

ठाणे जिल्ह्यातील शहापुरात पंडीत नाका येथील महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानातील कामगारावर 21 डिसेंबर 2024 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने दोन अज्ञात आरोपींने मोटारसायकल वर येऊन फायरिंग करून सोनाराची बॅग घेऊन पोबारा केला होता. शहापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Live Update : HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्टवर

कोरोनाचा कटू अनुभव पाहता HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. आरोग्य विभागाने या पार्श्वभूमीवर एक एसओपी तयार केली असून ती जिल्हा रुग्णालयाला पाठवली आहे. स्वतंत्र कक्ष ऑक्सिजन यासह आधुनिक सुविधा नियुक्त असे सेंटर तयार केले जात आहे या व्हायरसच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे वैद्यकीय अधिकारी धनंजय चाकूरकर यांनी केले आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com