
मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमधील छेडा नगर परिसरात होर्डिंग कोसळल्याची घटना समोर आली आहे. एक भलंमोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं आहे. होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली काही वाहने अडकल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि इतर बचाव पथक दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. होर्डिंगच्या ढिगाऱ्याखालून काही जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली जवळपास 100 जण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. 35 जणांना सुखरुप बाहेर काढल असून राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नक्की वाचा- मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात अचानक वातावरण का बदललं? काय आहे कारण...
वडाळ्यात लोखंडी ढाचा कोसळला
वडाळ्यात देखील उंच इमारतीच्या बांधकामासाठी उभारण्यात आलेला लोखंडी ढाचा कोसळल्याची घटना घडली आहे. बरकत आली याठिकाणी साईट पार्किंग रस्त्यावर कोसळल्याने खाली उभ्या असलेल्या अनेक वाहनांचं नुकसान झालं आहे.
नक्की वाचा- अंधार दाटला, धुळीचे वादळ आले, अवघ्या काही मिनिटात वातावरण बदललं
रेल्वेचा खांब वाकल्याने वाहतूक विस्कळीत
ठाणे आणि मुलुंडमध्ये रेल्वेचा खांब वाकल्याने मध्य रेल्वेची विस्कळीत झाली आहे. कल्याणवरून येणाऱ्या व जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. वांगणी रेल्वे स्थानकावरील पत्रे देखील उडाले.

Central Railway
Photo Credit: Central Railway
जोगेश्वरीत रिक्षावर झाड कोसळलं, चालक गंभीर जखमी
जोरदार वादळी वाऱ्यामुळे जोगेश्वरी पूर्वेकडील मेघवाडी नाक्याजवळील शिवसेना शाखा क्रमांक 77 जवळ उंच नारळाचे झाड ऑटो रिक्षावर कोसळले. या घटनेत हयायत खान हा रिक्षा चालक गंभीर जखमी झाला झाला. नागरिकांना रिक्षा चालक हयायत खान यांना जोगेश्वरी मधील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले.
ऐरोलीत हायटेन्शन टॉवरला आग
ऐरोलीत वीज वाहिनीच्या हायटेन्शन टॅावरला आग लागल्याची घटना समोर येत आहे. वादळी वाऱ्यामुळे टॅावरने पेट घेतल्याने वीजपुरवठा खंडीत झाला आहे. याचा फटका ऐरोली, दिघा परिसरातील नागरिकांना बसला असून येथील भागात वीजपुरवठा खंडीत झाला आहे.

Airoli Tower
Photo Credit: Airoli Tower
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world