जाहिरात
This Article is From May 16, 2024

होर्डिंग कोसळल्याने मुंबईपाठोपाठ पिंपरी हादरली, नेमकं घडलं तरी काय?

Pimpri Chinchwad Hording Collapse : घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवडमध्येही त्याच प्रकारची दुर्घटना घडली आहे.

होर्डिंग कोसळल्याने मुंबईपाठोपाठ पिंपरी हादरली, नेमकं घडलं तरी काय?
पिंपरी चिंचवडमध्ये होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.
पिंपरी चिंचवड:

सूरज कसबे, प्रतिनिधी

Pimpri Chinchwad Hording Collapse :  घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवडमध्येही त्याच प्रकारची दुर्घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड शहरात वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसाने, मोशी परिसरात रस्त्याच्या कडेला असलेले महाकाय होर्डिंग वाहनांवर कोसळले. मोही येथील जय गणेश साम्राज चौकातील रस्त्यावर असलेले हे होर्डिंग वाहनांवर कोसळले. यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र होर्डिंग खाली आलेली 3 ते 4 वाहनं चिरडली गेली आहेत.

घाटकोपरमधील दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू

घाटकोपरमधील छेडा नगर परिसरातील तब्बल 250 टन वजनाचं महाकाय जाहिराताचे होर्डिंग लगतच्या पेट्रोल पंपावर कोसळल्यामुळे 16 जणांच मृत्यू झाला आहे. ब याशिवाय 75 जखमींपैकी 44 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. हे होर्डिंग अनधिकृत असल्याने याचा मालक भावेश भिंडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे सोमवारी होर्डिंग कोसळल्याने आतापर्यंत 16 जणांनी आपला जीव गमावला आहे.

( नक्की वाचा : थरकाप उडवणारे 3 सेकंद, पेट्रोलसाठी लागली होती वाहनांची रांग; पाहा घाटकोपरमध्ये कसे कोसळले होर्डिंग )

घाटकोपर दुर्घटनेतील मृतांची नावं


भरत वसंत राठोड (25)
चंद्रमणी खारपालू प्रजापती (45)
दिनेशकुमार जैस्वाल (44)
मोहम्मद अक्रम - (48)
बसीर अहमद अली हनीफ शेख - (60)
दिलीप कुमार पासवान - (30)
पुर्णेश बाळकृष्ण जाधव - (50)
सतीश बहादूर सिंग - (51)
फहीम खलील खान - (20)
सूरज महेश चव्हाण - (19)
धनेश मास्टर चव्हाण - (48)
हंसनाथ रामजी गुप्ता - (68)
सचिन राकेश कुमार यादव - (23)
राजकुमार दास - (20)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com