जाहिरात

Malaika Arora च्या वडिलांचा मृत्यू कसा झाला? शेजाऱ्यानं सांगितल्या धक्कादायक गोष्टी

अभिनेत्री मलायका अरोराचे  (Malaika Arora) वडील अनिल मेहता यांची गेल्या काही दिवसांमध्ये कशी मनस्थिती होती ? याबाबत त्यांच्या शेजाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

Malaika Arora च्या वडिलांचा मृत्यू कसा झाला? शेजाऱ्यानं सांगितल्या धक्कादायक गोष्टी
मलायका अरोराच्या वडिलांनी मृत्यूपूर्वी केली होती या व्यक्तीशी चर्चा
मुंबई:

अभिनेत्री मलायका अरोराच्या  (Malaika Arora) कुटुंबावर अचानक दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मलायकाच्या वडिलांचं निधन झालंय. याबाबतच्या बातमीनुसार मलायका अरोराचे वडील अनिल मेहता  (Anil Mehta ) यांनी वांद्रेमधील त्यांच्या घराच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन जीव दिला. बुधवारी (11 स्पटेंबर) सकाळी 9 वाजता ही घटना घडली. पोलिसांनी अनिल मेहता (Malaika Arora Father ) मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. त्यानंतर त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजण्यात मदत होईल. दरम्यान, अनिल मेहता यांची गेल्या काही दिवसांमध्ये कशी मनस्थिती होती ? याबाबत त्यांच्या शेजाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कसे होते अनिल अरोरा?

अनिल मेहता यांचे शेजारी लाहिरी यांनी NDTV बरोबर बोलताना सांगितलं की तीन दिवसांपूर्वी त्यांचं अनिल मेहतांशी चॅटच्या माध्यमातून संभाषण झालं होतं. सोसायटीमधील मुद्यांवर दोघांमध्ये चर्चा झाली होती. ते अतिशय प्रेमळ व्यक्ती होते, असं शेजाऱ्यांनी सांगितलं. 

अनिल मेहता सर्वांशी प्रेमानं बोलत असतं. ते शेवटचं आमच्या घरी आले होते त्यावेळी पुढच्या वेळी एकत्र बसून बिर्याणी खाऊ असं त्यांनी सांगितलं होतं. पण, आज ही बातमी समजल्यानंतर मला अतिशय हताश वाटत आहे,' असं त्यांनी सांगितलं. 

( नक्की वाचा : चित्रपटाच्या बदल्यात लैंगिक शोषण, एन्ट्रीसाठी कोड नेम! सिनेमाच्या सर्वात 'डर्टी पिक्चर'च काळं सत्य )
 

आई-वडिलांचा झाला होता घटस्फोट

मलायका अरोराचं (Malaika Arora Father Death Reason)  तिच्या वडिलांशी नातं अतिशय गुंतागुतींचं होतं. मलायका 11 वर्षांची असतानाच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मलायका तिची आई जॉयस पॉलीकॉर्प आणि बहीण अमृतासोबत चेंबूरला राहयाला गेली. मलायकाची आई जॉयस ख्रिश्चन आहे. तर तिचे वडील अनिल हिंदू होते. ते निवृत्त होण्यापूर्वी मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
बाबा सिद्दिकींच्या हत्येच्या साक्षीदाराचा VIDEO आला समोर; गोळीबारानंतर नेमकं काय घडलं? पाहा
Malaika Arora च्या वडिलांचा मृत्यू कसा झाला? शेजाऱ्यानं सांगितल्या धक्कादायक गोष्टी
electrical equipment fell from the sky in Yeola area of ​​Nashik
Next Article
Nashik News : मोठा आवाज, लाल रंगाचा प्रकाश... आकाशातून पडलेल्या उपकरणाची येवला परिसरात चर्चा